सावित्रीमाई च्या जन्मामुळे समस्त स्त्रीयांना सन्मानाणी जगण्याची संधी मिळाली - समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी चूल व मूल याच्या ही पलीकडे लेखणी व शिक्षणाची मैत्री समस्त स्त्रीना घालून दिली व त्यांच्या त्यागामुळे आज शिक्षनाची क्रांती झाली व आज स्त्री जन्माचा उद्धार झाला. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी आपली प्रगती केली आहे स्त्रीयांना जगण्याची संधी व माणुशपण मिळाले आहे तरी काही स्त्री ह्या समाजात अजूनही स्त्री स्त्रीची विरोधक असतांना पाहायला मिळते असे चित्र का आहे? समाजातील खरे व वास्तव जर शोधले तर अजूनही काही स्त्री ह्या जातीव्यवस्था आणि मनूविचारसरणी च्या वाहक असताना दिसतात सावित्रीबाई फुले ना हे अपेक्षित होते का? सावित्रीबाई फुले नि तर महिलांचे संघटन व्हावे जातिभेद दूर व्हावा एकमेकी प्रति आदर सन्मान व्हावा गैरसमज करून घेऊ नये म्हणून हळदीकुंकू कार्यक्रम घेतला होता त्यात विचारांचे वाण वाटावे यामुळे एकमेकींचे विचार कळतील व समाजाची प्रगती होणार ही त्यांची यामागील भूमिका होती किती दूरदृष्टी होती त्यांची आणि आपण काय करत आहोत खरी सावित्री समजण्यासाठी आपल्या ला अजून किती वेळ लागणार आहे. याचे चिंतन करणे काळाची गरज आहे प्रत्येक स्त्री नि आपल्या जवळचे ज्ञान जवळ साचू न देता समाजात वाहते ठेवले पाहिजे जिथे योग्य प्रतिक्रिया ची गरज असते तिथे आपले मत योग्य प्रकारे मांडायला हवे बुद्धीला खाद्य पुरविणारे वाचन करावे जीवनात सत्याचे पालन करावे संकुचित विचार आचार बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार करावा सामाजाच्या कुटुंबाच्या हिताचे असेल त्यांचाच स्वीकार करावा आपल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपणच घ्यावा कारण स्त्री ही अबला नाही आहे ती शोधाची जननी आहे तिने स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. आत्मविश्वास व आत्मनिर्भर पणे जगावे स्त्री च्या संरक्षनासाठी भारतीय संविधानात वेगवेगळ्या कायद्याच्या तरतुदी केल्या आहे त्याचा उपयोग करून घ्यावा सावित्रीबाई फुले जन्माला च आल्या नसत्या तर स्त्रीयांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली असती का ? समस्त स्त्री ची आज काय अवस्था असती? म्हणून समाजातील सर्व घटकांनी स्त्री जन्माचे स्वागत करावे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी माळी समाज पेंढरी कोकेवाडा मुरपार येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेवराव पिशे उदघाटक प्रा. मानकर प्रमुख मार्गदर्शक बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे , प्रा .विनोद लांडगे तर प्रमुख अतिथी प्रा. ईश्वरराव मोहूर्ले गोंडवना विद्यापीठाचे कुलसचिव ,प्रा. कोलतारवार ,प्रा. चांदेकर, ड्रा संतोष गुरनुले, वनरक्षक गुरुनुले ,वाडगुरे मॅडम,शांताराम आदे मेंधुळकर घनश्याम चौके सुभाष राऊत ,नीलकंठ बनसोड ,ताराचंद मसराम ,विनायक बांबोडे,राजेंद्र भैसारे आदि उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धा, गितगायन ,वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भास्करराव वाढई यांनी केले तर संचालन कु.मयुरी सोनूले यांनी केले तर आभार वृषाली गुरनुले हिने मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण माळी समाजबांधवाणी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!