सोमवार पासून राज्यात शाळा सुरू?



मुंबई (वृत्तसेवा)
कोरोना च्या तिसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सोमवारपासून सुरू करण्याचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
तिसर्‍या लाटेत शाळा बंद केल्याने राज्यभर पालकांनी व शिक्षण तज्ज्ञांनी नाराजीचा सूर व्यक्त केला होता. मात्र आता शालेय शिक्षण विभागाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविल्याने येत्या सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!