महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउच्या उंबरठ्यावर?
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउच्या उंबरठ्यावर?
मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी, राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. रूग्णांची संख्या वाढल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल. असे झाले तर पश्चिम बंगाल सारखे निर्णय घ्यावे लागतील असे अजीत पवार यांनी मत व्यक्त केले आहे. दोन दिवसापूर्वीच पश्चिम बंगालने कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पश्चिम बंगाल मध्ये कठोर निर्बंध लावीत शाळा महाविद्यालये बंद केली होती.
दरम्यान मुंबईच्या पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्याचे संकेत मुंबई मनपाने दिले. दहावी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू राहील असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर टिका करीत, देशात लॉकडाउनबाबत सर्व राज्यात सारखे धोरण असावे अशी मागणी केली. राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन आॅक्सीजन लागेल त्या दिवसापासून लॉकडाउन लावावा लागेल असे सांगीतले. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील असेही सांगीतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!