मकर संक्रांति विशेष लेख ( छाया शिरपुरवार मूल )
विशेष लेख:- सौ. छाया दिलीप शिरपुरवार मूल
मकर संक्रांति तिळगुळ घ्या गोड गोड बोला पौष महिन्यात येणारा संक्रांतीचा सण हा महाराष्ट्रा च्या सामाजिक जीवनातला एक महत्त्वाचा उत्सव आहे. "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला". असे एकमेकांना म्हणत जुने ,नवे धागे अधिक कशे स्नेहाने घट्ट करण्याचा व एक दिलाने वागण्याचा संदेश देणारा हा एक मंगल दिन आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो पुढील सहा महिन्याच्या कालखंडात उत्तर गोलारधात अधिक प्रकाशमान होणार असतो ही संक्रमण स्थिती मकर संक्रांती म्हणून ओळखली जाते. संक्रांत या उत्सवाचे आराध्यदेवता सूर्य असल्याने सूर्यनारायणाचा उत्तरायनातील आगमनाचे अत्यानंदाने स्वागत केले जाते. संक्रांतीच्या पुण्यकाळी संगमावर तीळ, बोर पाण्यात टाकून स्नान करण्याची प्रथा आहे. यामध्ये फक्त देहशुद्धी अभिप्रेत नसून, आत्मशुद्धी ,आत्मचिंतन याचाही समावेश आहे. अज्ञान अंधकारात तसेच मनात व समाजात दाटलेली मरगळ वैमनस्य आणि शत्रुत्व हे सर्व विसरून अंतर्बाह्य सूचीभृत होऊन प्रकाशाने उजळलेल्या नव मार्गावर वाटचाल करण्याचा हा परिवर्तनाचा काळ आहे. सर्वांनी सामंजस्याने वागावे सहकार्याने रहावे ,यासाठी गोड बोला, अशा संदेशाची देवाणघेवाण करणे हे संक्रांत सणाचे वैशिष्ट्य आहे. संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभात स्त्रिया, वाण देतात. ही प्रथा म्हणजे एक प्रकारचे दानच आहे . सूर्यनारायणाच्या दातृत्वाचा आदर करण्यासाठी मकर संक्रांति ते रथसप्तमीपर्यंत बायका वाण, दान करतात. वास्तविक, तीळ गूळ देण्यामागील भाव असा आहे की, तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे कारण ,आत्मा ज्योती "बिंदू स्वरूप" आहे. गुळाची गोडी हे, आत्म प्रेमाचे प्रतीक आहे. तिळगुळाचे लाडू हे आत्मिक एकता व मधुर तेचा आधार आहे म्हणजेच ,आत्मा आणि परमत्माचा परिचयच. आपल्यात बंदुत्वभाव अर्थात आत्मिक स्नेह असला पाहिजे परंतु आजचा मानव स्वतःच्या सत्य आत्मिक स्वरूपालाच विसरला आहे .तसेच परमात्मा शिवालाही विसरला आहे. परिणाम ता आजच्या जगात अनेक भेदाभेद उदाहरणार्थ धर्म, जाती ,भाषा, प्रांत, संस्कृती, इत्यादी अस्तित्वात आहेत. यातूनच आपसात मतभेद, तंटे, हिंसाचार, यासारख्या गो ष्टी सर्वत्र पाहायला मिळतात. केवळ पार्किंगच्या जागेवर येऊन सुद्धा हिंसाचार होताना दिसते. एकंदरीत मनुष्याच्या जीवनातील मधुरता, प्रेम ,दया ,शांति, क्षमा, या सर्व गोष्टी जणू लुप्त झाल्या सारख्या वाटतात. अशावेळी आवश्यकता आहे ती आध्यात्मिक ज्ञानाची, सर्वाशी आत्मिक प्रेमाने वागण्याची एखाद्याशी पटत नसेल, तर त्यालाही देवाने निर्माण केले आहे आणि त्यातही एखादा विशिष्ट सद्गुण असेलच तेव्हा त्याच्याशी पटवून घेणे. त्यामुळे आत्मिक प्रेम निर्माण होईल, असे वागणे. आत्मिक स्नेहाने आपण सर्वाचे स्नेही बनू शकू, आत्मिक स्नेहाने आपण सदैव सर्वाकडून सद्भावना सहयोगाची भावना वाढत जाऊन, प्रेम मिळेल. आनंद मिळेल .यालाच आपण आपले यथार्थ वर्तन समजू या. आजच्या धकाधकीच्या जगात मानसिक शांतीसाठी प्रत्येक मनुष्य धडपडतोय तेव्हा ,ईश्वर प्राप्ती ही माणसाच्या कर्मा तू नच आपापसात तू नच, आधी सुरुवात होते ,ती वाढत पूर्णत्वास जाते .शुद्ध ,निस्वार्थ प्रेम आहे ,तर जगत आहे, जीवन आहे. प्रेम नाही तर जीवन नीरस आहे. सारी दुनिया परमात्मा प्रेमासाठी आसुसलेली आहे याचेच गायन आहे," तू प्यार का सागर है! तेरी, एक बूंद के प्यासे हम! ईश्वराचे, सदा चिंतन करून स्वतःचा सोबती करून तिळाएवढे सूक्ष्म व गुळा एवढा गोडवा साक्षी करणे हे योग युक्त जीवन सुंदर आणि विलक्षण बनू शकते.
सौ. छाया दिलीप शिरपुरवार, मुल



Nice aji
उत्तर द्याहटवा