राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

तळोधी बा.:

    नांदगाव येथे अ. भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळ, वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव येथे इयत्ता ५वी ते ७वी(पहिला गट) व इयत्ता ८वी ते १०वी (दुसरा गट) या  दोन गटातील विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ५७ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या गटात जि. प. उच्च प्राथमिक शाळा नांदगाव येथील वर्ग ७वीचे विद्यार्थी, नयन सुरेश रामटेके  व राधिका रविंद्र वेटे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविले. दुसऱ्या गटात संत गजानन विद्यालय, चिखलगाव येथील इयत्ता १०वीची विद्यार्थीनी प्राची भाष्कर गायकवाड प्रथम व जनता विद्यालय, नागभिड येथील इयत्ता १०वीचा विद्यार्थी गणेश सुधाकर वलके याने द्वितीय क्रमांक पटकाविला. दोन्ही गटातील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना अ. भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळ नांदगावच्या वतीने नांदगाव येथील माजी पोलीस पाटील जगन्नाथ सोनवणे, माजी सरपंच दादाजी नन्नावरे, माजी ग्रा. पं सदस्य विनायक सोनवाणे, माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश बोरकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात  आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना नांदगाव येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे युवा कार्यकर्ते श्री. अरविंद सोनवणे यांच्या कडून प्रोत्साहनपर नोटबुक व पेन बक्षीस देण्यात आले.
    या परीक्षेचे संयोजन जि. प. उच्च प्राथमिक शाळा नांदगाव येथील विषय शिक्षक अनिल लोनबले यांनी केले. पर्यवेक्षक म्हणून सहा. अध्यापक अशोक सुकारे, प्रभाकर लोंढे यांनी काम पाहिले. तसेच पेपर तपासणी साठी सहा. अध्यापक विकास बोरकर, मारोती आनंदे व विषय शिक्षक श्रीराम राठोड यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, नांदगावचे अध्यक्ष चंद्रशेखर दडमल,  संत गजानन विद्यालयाचे सहा. अध्यापक भाष्कर गायकवाड, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आशिष मेश्राम, आशिष रामटेके, हरिश सहारे यांनी उत्तम सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!