ग्रामपंचायत व फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

ग्रामपंचायत व फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मूल (अमित राऊत )

मूल तालुक्यातील ग्रामपंचायत चिचाळा व फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा यांच्या संयुक्त विद्यमाने  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्य चिचाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
१) ग्रामस्वच्छता
फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा च्या वतीने सकाळला ७ ते ११ गावातील मुख्य चौक, मुख्य रस्ता, अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायत जवळील परिसर सामूहिक श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला.

२) जि. प. शाळेत नोट बुक वाटप कार्यक्रम
फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा च्या वतीने सामुहिक वर्गणीतून  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नोट बुक व बाल पेन वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शाळेतील 205 विद्यार्थांना  संस्थेच्या संस्थापक व सर्व सभादांनी मार्गदर्शन केले.

3) माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली प्रदर्शन व जनप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
ग्रामपंचायत चिचाळा , फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा, गावातील सर्व महिला बचत गटातील महिलावर्ग , शाळेतील विद्यार्थी , गावातील युवक  व शेतकरी वर्ग या सर्वांनच्या संयुक्त विद्यमाने भव्य- दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याच प्रमाणे  मुख्य शिवाजी चौक चिचाळा येथे जनप्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात  कु.रिना रवी मोहुर्ले, आर्यन संतोष लेनगुरे, प्रणय संतोष लेनगुरे या शाळकरी विद्यार्थांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.

४) सामूहिक श्रमदानातून वनराई बंधारा
मूल तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय चिचाळा च्या आव्हानाला प्रतिसाद देत चिचाळा येथील फार्मर रायडर्स समूहच्या तथा इत्तर सुशिक्षीत युवा तरुणांनी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, पाण्याचे महत्व, भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, पिण्याचे पाणी उन्हाळ्यात पुरावे, मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, परिसरातील जलपातळी वाढावी, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे याकरिता सामाजिक जाणीवेतून चिचाळा लगत वाहणाऱ्या उमा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीजवळ सामूहिक श्रमदानातून दोनशे पोत्यांचा वनराई बांधत चिचाळा वासीयांना सामाजिक बांधिलकीचा  मंत्र दिला. 

अश्या प्रकारे ग्रामपंचायत चिचाळा  व फॉर्मर राईडर असोसिएशन चिचाळा यांच्या संयुक्त विद्यमाने  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात दोन दिवस सण उत्सवासारखे साजरे करण्यात आले. या सर्व कार्यक्रमात गावातील युवक,महिला वर्ग व गावातली समस्त नागरिकांचा उ्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!