नेरी येथील अरविंद सुरेश खाटीक व त्यांचा लहान भावा वर चिमुर पो.स्टे.येथे प्रतिबंधक गुन्हा दाखल असतांना आरोपी मोकाट कसा ?

पांढरवाणी येथील माना समाज अनुसूचित जमाती वर अत्याचार

पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव तर नाही ना ?

लोकप्रतिनिधी च्या नावावर देतात पदाधिकारी व कार्यकर्ते धमक्या

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा पांढरवाणी येथील प्रकाश भाऊराव वाघमारे यांनी दिनांक.04 जानेवारी 2022 ला चिमूर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार नेरी येथील अरविंद सुरेश खाटीक व त्यांचा लहान भाऊ यांचेवर भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम कलम 294 ,506, 34 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 कलम 3 (1) (r) व 3(1)(s) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून यावर कुठल्याही प्रकारची पुढील कार्यवाही केली जात नसून आरोपी सुसाट पणे मोकाट फिरत असल्याने त्यास अटक का केल्या जात नाही असा जनतेला प्रश्न पडला आहे.त्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे कि सदर प्रकरणातील आरोपीचा भाऊ भाजपाचा एक युवा नेता लोक प्रतिनिधी चा कार्यकर्ता असून त्या लोक प्रतिनिधी च्या दबावात तर पोलिस प्रशासन येत तर नाही ना ? किंवा दबाव टाकला जात आहे म्हणून पोलिस कारवाई करीत तर नाही असे असेल ? अशी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सदर प्रकरणात लोक प्रतिनिधी व स्थानिक कार्यकर्ते जनतेच्या रोषाला समोरे जावे लागत आहे त्यामुळे भाजपची जनाधार कमी होण्याची शक्यता बळावली आहे. सदर प्रकरणात ज्यांचे वर अन्याय केलेला आहे ते भाजपाचे कार्यकर्ते आहे हे विशेष! सविस्तर वृत्त असे की, घटनेच्या दिवसापासून अंदाजे दोन वर्षांपूर्वी आरोपीचे वडील सुरेश खाटीक याने पांढरवाणी येथील पिण्याच्या पाण्याचे टाकीजवळ ढिगारा ठेवला होता त्या ढिगार्‍याचे पाणी पावसाळ्यात टाकीच्या वाल मध्ये जात असल्याने गावकरी लोकांनी त्यांचा विरोध केला तेव्हापासून त्याने गावकऱ्यांचा राग मनात धरला असून त्याचे दुसरे दिवशी सुद्धा प्रकाश वाघमारे टू व्हीलर ने नेरीला आले असता आरोपीने त्याच्या गाडीला कट मारली परंतु त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. घटनेच्या दिवशी 04 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रकाश वाघमारे यांनी आपली बैलबंडी आपले घराचे समोर सोडून बैलाला पाणी पाजण्यासाठी घराचे आंगनात बांधले त्यानंतर बैलबंडी चे मागचे बाजूने बांधून असलेले गाय व बैल सोडण्यासाठी बैल बंडी जवळ आला असता बैल रस्त्यावर आला तेवढ्यात पांढरवांनी शेत शिवारातून आरोपीची टू व्हीलर बैलाजवळ आली त्यावर अरविंद खाटीक व त्याचा भाऊ बसले होते त्यांनी प्रकाश वाघमारे यांना बैल रस्त्यावर आला त्यामुळे विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करणे चालू केले त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व बैल पाणी पाजण्यासाठी बोरिंग जवळ गेला. परत पुन्हा तिथे जाऊन दोघांनी शिवीगाळ करणे सुरू ठेवले व म्हणाले मागच्या वेळेस टाकीच्या पाण्याबाबत वाद झाला तेव्हा तूच समोर होताच गावकऱ्यांना चढवतोस तुला जिवंत मारल्याशिवाय सोडणार नाही आणि जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केला. त्यानंतर सदर प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.    अशाप्रकारे खाटीक कुटुंबियांकडून संपूर्ण गावांमध्ये लोक प्रतिनिधी च्या नावाचा गैरवापर करून दहशत पसरविण्यात येत आहे त्यांनी स्वतः पांढरवांनी येथील अनुसूचित जाती-जमातीच्या व इतर कुटुंबे असे 16 कुटुंबातील लोकांना त्यांचे नावे जागा असून सुद्धा ती जागा माझीच आहे असे म्हणून घरकुलाचे काम थांबवून सदर जागेवर डोजर लावून जबरदस्तीने जागा खोदून घरकुलाचे काम थांबविले त्याची केस चिमूर कोर्टातचालू आहे.अश्याच पद्धतीने अवैध धंदे करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमिच लोक प्रतिनिधीच्या नावाने कर्मचारी व अधिकाऱ्याना धमकावण्याचे काम चिमुर तालूक्यात सुरू आहे.कार्यकर्ता मध्ये पुरूषा बरोबर महिला सुध्दा आहे.कार्यक्रमामध्ये लोक प्रतिनिधी च्या जवळ पास असतात व जसे लोक प्रतिनिधी मोठ - मोठ्याने घोषना देतात त्याच पद्धतीने अवैध धंदे करणारे सुध्दा मोठ - मोठ्या आवाजाने घोषना बाजी करीत असतात.जेने करून एक प्रकारचे अधिकाऱ्यांना सुचवित असतात कि आम्ही लोक प्रतिनिधीच्या किती जवळचे आहोत.
एकाद्या कार्यकर्ता व पधाधिकारी यांचेवर अवैध धंदे करतानी अधिकाऱ्यानी कार्यवाही केली की तात्काल त्या अधिकाऱ्यावर घेरावा देऊन किंवा प्रतिनिधीला फोन करून कार्यवाही रोकण्याचे काम कार्यकर्ता व पदाधिकारी करीत असतात.करीता लोक प्रतिनिधी या बाबीकडे जातीने लक्ष देऊन अन्याय झालेल्या पांढरवाणी येथील अनुसूचित जाती-जमातीच्या सोडा कुटुंबातील लोकांना न्याय देण्यासाठी पुढे यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. पंतप्रधान योजनेतून सदर व्यक्तींना घरकुल मंजूर झालेले असून काही चे बांधकाम पूर्ण झालेले आहे काही चे बांधकाम व्हायचे आहे त्यांची कामे अडकलेली आहे. आदरणीय पंतप्रधान साहेबांची घरकुल हि महत्त्वाकांक्षी योजना असून 2022 पर्यंत सर्वांना घरकुल देण्याची योजना आहे. परंतु त्यांच्याच भाजपचा कार्यकर्ता या योजनेपासून घरकुल योजनेच्या आळ येत असून पंतप्रधानाच्या योजनेच्या आड येत असल्यामुळे हे कितपत योग्य आहे अशी मागणी पत्रकार परिषदेत गावकऱ्यांनी केली आहे.तसेच सदर प्रकरणात आरोपींना अटक करून सर्वांना न्याय मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. माना समाज आदिम जाती च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. जर न्याय मिळाला नाही तर माना समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला या पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त प्रकाश वाघमारे ,अन्यायग्रस्त सोडा कुटुंबे ,समस्त गावकरी तसेच माना समाजाचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!