प्रकाश विद्यालय अड्याळ येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा च्या माध्यमातून बी. एस. डब्ल्यू. सेकंड ईयर च्या, विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व समाज जागृती कार्यक्रम संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - प्रकाश विद्यालय अड्याळ येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा च्या माध्यमातून बी.एस. डब्ल्यू.सेकंड ईयर च्या, विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व समाज जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. एम. शहारे मुख्याध्यापक प्रकाश विद्यालय अड्याळ प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सुशांत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अड्याळ सोबतच प्रमुख पाहुणे एन. एस. वैदय पर्यवेक्षक मुनीश्वर , चेपे , गभणे, कुलकर्णी मॅडम या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी स्त्रीभ्रूणहत्या,, व्यक्तिमत्व विकास,, स्त्री पुरुष समानता,,व्यसन मुक्ती,, अंधश्रद्धा निर्मूलन हे विषय देण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक लोकेश कुर्झेकर , स्वप्निल धुळसे ,रोहित घाटोळे , ज्ञानदीप सेलोकर बी. एस. डब्ल्यू.सेकंड ईयर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!