मुलच्या तलावात वृद्धाची आत्महत्या

मुलच्या तलावात वृध्द इसमाची आत्महत्या


#Public_Panchanama
Mul
मूल (अमित राऊत)

मूल येथील बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या तलावात पडून एका वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना आज चार वाजता उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या चे नाव मोहन मार्कंडी तेलावार (75) असे आहे. मोहन तेल्लावर हें काल दिनांक 26 च्या सायंकाळ पासून घरून निघून गेले होते. ते घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी मूल पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदविण्यात आली.


लगेच मूल पोलिसांनी शोध सुरु केला असता बसस्थानकाला लागूनच असलेल्या तलावाच्या काठावर मोहन तेलावार यांची चप्पल दिसली. तलावात शोध घेतला असता त्यांचा प्रेत आढळून आला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नव्हते.
पोलिसांनी प्रेताचा उत्तरीय पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मुलचे ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेले.
पुढील तपास मुलचे ठाणेदार सतीशसिह राजपूत यांच्या मार्गदर्शनात मूल पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!