कोठारीत घडला छायाचित्रकारांच्या मैत्रीचा सोहळा
कोठारीत घडला छायाचित्रकारांच्या मैत्रीचा सोहळा
Public_Panchanama
Mul
कोठारी (प्रतिनिधी)
बल्लारपूर तालुका ग्रामीण छायाचित्रकार संघटना व छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील महीपालसिंग बाबा टेकडी येथे पहिल्यांदाच जिल्हास्तरीय छायाचित्रकारांचा मैत्री सोहळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे, उदघाटक बल्लारपूर पंचायत समिती उपसभापती सोमेश्वर पदमगिरीवार, प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत कोठारी सरपंच मोरेश्वर लोहे, जय वर्मा, कवी भट, प्रविण करोडे, गोलु बाराहाते, प्रमोद कातकर, आनंद गोंगले, अनिल विरुटकर, श्रीधर मोरे, शिला गुरूनुले, जयकरण कश्यप, के. एम.रेड्डी, रवी भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी छायाचित्र क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील तसेच पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत सेवाभावीकाचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सोमेश्वर पदमगिरीवार, जय वर्मा, कवी भट, प्रविण कलोडे, गोलू बाराहाते, आनंद गोंगले, लोमेश जावलीकर, अनिल विरुटकर, श्रीधर पा.मोरे , शिला गुरूनुले, जयकरण कश्यप, के. राजु, संजय बानखेडे, सुशिला लोभाने, देवा बुरडकर, पत्रकार सुरेश रंगारी, राज जुनघरे, प्रमोद येरावार ,मदन नैताम, दिनेश गोवर्धन, केशीप पाटील, शंकर चक्रवर्ती, चंद्रपूर तालुका छायाचित्रकार संघटना, ब्रम्हपुरी तालुका छायाचित्रकार संघटना, नागभिळ तालुका छायाचित्रकार संघटना, मुल तालुका छायाचित्रकार संघटना, बल्लारपूर तालुका छायाचित्रकार संघटना, चिमुर तालुका छायाचित्रकार संघटना, भद्रावती तालुका छायाचित्रकार संघटना, गोंडपिपरी तालुका छायाचित्रकार संघटना, सिंदेवाही तालुका छायाचित्रकार संघटना, सावली तालुका छायाचित्रकार संघटना, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, चामोर्शी तालुका छायाचित्रकार संघटना, यवतमाळ वणी तालुका छायाचित्रकार संघटना, वर्धा हिंगणघाट तालुका छायाचित्रकार संघटना आदी छायाचित्रकार संघटनांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अपघातात निधन झालेले छायाचित्रकार दिलिप लोनगाडगे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी सुवर्णा लोणगाडगे व मुलांना एक लाख रुपयेचा धनादेश छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांचेकडून प्रदान करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात सन २००७ पासून उदयास आलेली छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था छायाचित्रकारांच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी सतत कार्यरत असून ही संघटना चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांत छायाचित्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरत संघर्ष करीत आहे. यापुढे ही विदर्भातील छायाचित्रकारांना एकत्रित करून त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी कार्य करणार असल्याचे अध्यक्ष नितिन रायपुरे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर तालुका ग्रामीण छायाचित्रकार संघटनेचे विवेक रामटेके, शुभम बुटले, पंकज जावलिकर, बंडु देवतळे, कुणाल जावलीकर, प्रफुल जिवने, शैलेश बांबोडे, आकाश कांबळे, धम्मदिप दुर्योधन, राहुल देठे , अमोल बोथले आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन फुलचंद मेश्राम, सुत्र संचालन सुरेश रंगारी यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!