संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष ईजाज शेख यांच्या वाढ दिवसानिमित्त मातोश्री वृदधाश्रमात फळवाटप व स्वच्छ्ता




प्रतिनिधी:- मूल 

  आज संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष मा. ईजाजजी शेख यांचा वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम मध्ये जाऊन फळवाटप व वृद्धाश्रम परिसरातील स्वच्छता करण्यात आली. अतिशय सुंदर उपक्रम संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे त्यांचा जिल्हाध्यक्ष ईजाज शेख यांचा वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. याप्रसंगी संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर चे संघटक विश्वजित नायक, संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूरचे महिला सदस्य श्रद्धा कोहळे,कोमल मंडल, लव्हली तुलसानी एकता तुमराम, सौरभ गेडाम, गुणवंत चामटे, अजय तोटम, सिध्दार्थ निमसरकार, राणी यादव, श्वेता नंदुरकर, सोनल कामडी, पंकज साहू, अबेज शेख, दिक्षा, लोकेश व समस्त संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संजीवनी फाऊंडेशन चे चेअरमन श्री.ज्ञानेश्र्वर वसंतराव सानप, सचिव श्री.गोरक्ष चांगदेव भवर, विस्तार समिती अध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रमुख श्री. राजेश बसवेश्वर हजारे, नागपूर विभाग विश्वस्त श्री. शुभम निंबाळकर इत्यादींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच ईजाज शेख यांना संजीवनी फाऊंडेशन तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!