आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेचा लक्षवेधी आमरण उपोषण सुरू

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि. २७/१०/२०२१ ला 
आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेने लक्षवेधी आमरण उपोषण सुरू केले असून मागणी क्रमांक.(१) तहसिलदार पवनी व उपअधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंबंधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
(२) तहसिलदार पवनी व उपअधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांना निलंबित करण्यात यावे.(३)भारतीय दंड संहिता १८६० फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ नुसार फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा व तात्काळ निलंबित करण्यात यावे.
(४) गुडेगाव, खातखेडा, भोजापूर व इटगांव, कुर्झा हे घाट १०/३/२०२० रोजी शासनाच्या नियमानुसार सुरू झाले व ३०/०९/२०२१ रोजी बंद झाले होते त्या संपूर्ण कालावधीचा सीसीटिव्हीफुटेज देण्यात यावे.
(५) रेतीची अवैध वाहतुक बंद करण्यात यावी (कायम स्वरूपी). (६) शासकिय जीआर नुसार घरकुल बांधकाम करणाऱ्या व्यक्तिंना रेती काढण्यासाठी घाटाची नेमणूक करून देण्यात यावी. अशा सहा लक्षवेधी मागण्यांना घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद आमरण उपोषणाला बसली असून दामोधर सुरकर विदर्भ सचिव, किशोर जुमले विदर्भ जनसंपर्क अधिकारी, पुरुषोत्तम नंदनवार पवनी अध्यक्ष, मोनू खान, विषणु जीभकाटे, शेखर जिभकाटे,विजू मानापुरे या लक्षवेधी आमरण उपोषणाला बसले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!