राष्ट्रवादीचे 'हे' मंत्री म्हणतात, 'केजरीवाल यांनी देश चालवावा!'
राष्ट्रवादीचे 'हे' मंत्री म्हणतेय, 'केजरीवाल यांनी देश चालवावा!'
1992 पासून मी राजकारणात आहे, पण असे शिक्षण मंत्री मी कधीच पाहिले नाही. जन सामान्यांसाठी खूप चांगली सोय झाली आहे. केजरीवाल (Kejriwal) आणि सिसोदिया (Sisodiya) यांनी देश चालवावा. हे मत आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे (NCP) नेते, पर्यावरण राज्यमंत्री संजय बन्सोडे ( Minister of State for Environment , Sanjay Bansode) यांचे. नाम. बन्सोडे यांनी दिल्लीत जावून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेवून, दिल्लीतील शिक्षण क्रांती आणि मोहल्ला क्लिनीकची माहिती घेतली. तेथील आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) सरकारच्या कामानी प्रभावीत होत, त्यांनी, केजरीवाल व सिसोदीया यांनी देश चालवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
नाम. बन्सोड यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, 'मुझे शरद पवार (Sharad Pawar) साहब ने, केजरीवाल सरकार के गव्हरमेंट स्कूल (School of Delhi) और मोहल्ला क्लिनीक (Mohalla Clinic) देखने दिल्ली भेजा. मै 1992 साल से राजनिती में हू, लेकीन सरकारी शिक्षा का एैसा मॉडेल हमने पहली बार देखा. मै शाम को पवार साहब से मिलकर, इस मॉडेल के बारे में उनसे बात करूंगा. मनिषजी और केजरीवालजी जैसे लोगों को देश की सत्ता चलानी चाहीए' असे स्पष्ट मत व्यक्त केले.
काय म्हणाले पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे ? ट्विट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उल्लेखनीय म्हणजे आम आदमी पार्टीचे राष्ट्रिय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी, आम्ही राजकारण करण्यांसाठी नाही तर, राजकारण शिकविण्यांसाठी आलोय, असे वारंवार आपल्या भाषणातून सांगत असतात. राज्यातील राजकीय नेते, दिल्लीत जावून तेथील शिक्षण आरोग्य यांचे मॉडेलचा अभ्यास करतात, आणि राज्यात तसे काम करण्यांचे जाहीर करतात. यावरून, केजरीवाल यांची राजकारणातील भूमिकेवर शिक्कामोर्तब होत आहे.
#Public_panchanama




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!