चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नीयूक्त करा

शिवसेना महिला आघाडीचे पोलिस निरीक्षण मनोज गभने यांना दिले निवेदन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकीचा कार्यभार पोलिस उप निरीक्षक गायकवाड़ ४ पोलिस कर्मचाऱ्या सहित उत्तम रित्या सांभाळत आहेत. पन नेरी पोलिस चौकिला ३० गावे समाविष्ट असून रात्रीच्या वेळेला एकही पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. नेरी शहर हे व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण असून चिमूर मुख्यालयापासुन ११ किलोमीटर अंतरावर आहे, नेरी पोलिस चौकीपासुन पोलिस चौकी अंतर्गत येणारे गावे ११ ते १५ किलोमीटर अंतरावर असून रात्रीच्या वेळेला कोणतीही अनुचित घटना घडल्यास चिमूर पोलिस स्टेशनला जाण्यास अंतर जास्त होत असल्यामुळे पोलिस स्टेशनला पोहचने शक्य होत नाही.पोलिस चौकिला रात्रपाळीत पोलिस कर्मचारी राहत नसल्यामुळे अवैध धंदे वाइक सरसावले आहेत, नेरी चौकिला रात्र पालित पोलिस कर्मचारी उपस्थित रहिल्यास अवैध धंदे, महिला अत्याचार, व नागरिकांना कोणत्याही प्रकरनाची तक्रार देण्यास कोणतीही अड़चन येणार नाही.व चिमूर मुख्यालय येथे जाण्याचा त्रास वाचेल, करीता  नेरी पोलिस स्टेशनला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करण्यात यावे, या करीता शिवसेना महिला आघाडी नेरी च्या वतीने पोलिस निरीक्षण मनोज गभने याना निवेदन देण्यात आले.या विषयावर पोलिस निरीक्षक मनोज गजभे यांच्याशी चर्चा केली असता नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करणार असे मत व्यक्त करण्यात आले. निवेदन देते वेळी शिवसेना चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधा घुघूसकर, महिला आघाडी विभाग प्रमुख दीपकौर भौंड, विभाग विभाग प्रमुख आशीष बगुलकर, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, गंगूबाई मसराम, रंजना निबटे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!