ख्रिस्ती समाजाकरिता स्मशानभूमी द्या, खासदार धानोरकर यांना साकडे



#Public_Panchanama
Mul
मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यातील ख्रिस्ती बांधवा करिता स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी स्थानिक ख्रिस्ती बांधवांनी खासदार बाळू धानोरकर Balu Dhanorkar MP यांचेकडे केली.
खासदार बाळू धानोरकर मूल येथे आले असता त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. आपण लवकरच ख्रिस्ती बांधवा करिता स्मशानभूमीची व्यवस्था करून देऊ असे आश्वासन त्यांनी ख्रिस्ती बांधवांच्या शिष्टमंडळास deligation दिले.
मागील १०० वर्षापासून आम्ही मुल येथे सर्व ख्रिस्ती बाधव राहत आहोत. हळूहळू मुल शहरात तसेच आजूबाजूच्या खेडयापाडयात खिस्ती Christian Community समाजाची वाढ होत आहे. आणि ही संख्या १०० पासून २००० पर्यंत झाली आहे. पण अजूनपर्यंत खिस्ती समाजासाठी कोणत्याही प्रकारची स्मशान भूमी मूल येथे नसल्याने दफन विधी चंद्रपूर येथे जावून ख्रिस्ती समाज स्मशान भूमी मध्ये करावे लागते. गोरगरीब लोकांकडे पैसा नसल्याने त्यांचे दफन विधी मुल येथे अनियोजीत जागेत केल्या जाते. हि एक समाजाची मोठी शोकांतीका आहे. याकडे ख्रिस्ती बांधवांनी खासदार धानोरकर यांचे लक्ष वेधले.
खिस्ती समाजाच्या वतीने स्मशानभूमीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रपूर तसेच आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार Sudhir Mungantiwar Ex Minister यांना वेळोवेळी सूचना देवूनही कोणत्याही प्रकारची हरकत झालेली नाही. वरील समस्या १९८६ साली प्रशासना समोर मांडण्यात आली असता मौजा मुल येथे गट क्रमांक ४६३ आराजी १.३४ हेक्टर जमीन खिस्ती समाजाच्या स्मशान भूमीसाठी रा.मा.क.१ / एल एन्ड डी १९८५,८६ मधील आदेश दिनांक २६/०४/१९८६ अन्वये मंजूर करण्यात आली होती. परंतू तेथे काही कच्चे घराचे अतिक्रमण असल्याने समाजा तर्फे नगरपरीषद मूल यांना अतिक्रमण हटविण्याचे निवेदन १९/०९/१९९० ला देण्यात आले असता नगरपरीषद मूल किंवा प्रशासनाद्वारे कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळे अतिक्रमण दिवसेदिवस वाढत गेली. संबंधित प्रकरणाला त्रासून दिनांक १८/०२/१९९१ ला श्रीमान सबडीव्हीजन अधिकारी चंद्रपूर यांचे कडे या संबंधी अर्ज सादर केला असता त्यामध्ये रामतुकूम भू.क.१५ ची जमीन मोकळी आहे. तसेच त.सा.क. /४ मधील झुडपी जंगल / ख.न.२८२ / आराजी १.५९ हेक्टर या जागेची मागणी केली होती. संबंधीत जागा ही सार्वजनिक स्मशान भूमी मूल उमा नदीला लागून असून आ / १.५९ हेक्टर सोडून बाकी जागेवर नगर परीषद Municipal Council Mul ची झाडे लागली होती. आणि आता या जागेवर भव्य वालकंपाडुन आणि
सार्वजनिक स्मशान भूमीचे स्मशान घाट झालेले आहे. परंतू त्याला लागून असलेली खुली जमीन खिस्ती समाज बांधवाना स्मशान भूमीसाठी देण्याचे आश्वासन नगर परिषदने दिलेले होते. मात्र यावरही अजून पर्यंत कार्यवाही झाली नाही. ५० वर्षापासून स्मशान भूमीसाठी चाललेल्या या लढयाला अंतिम न्याय देवून ख्रिस्ती समाजाच्या अधिकाराला सन्मान देण्यात यावा. कारण खिस्ती समाजाच्या अधिकारांनवर अन्याय कारक रीत्या मानसीक त्रास झालेला आहे. आणि खिस्ती समाज फक्त आणि फक्त आपल्या स्ममशान भूमीसाठी शांततेने जाणीवपूर्वक लढा देत आहे. मागील वर्षापासून प्रशासनाव्दारे आमच्या समाजा संबंधी कोणतेही महत्वाचे पाऊल उचलेले नाही आणि या समाजाला अधिकारापासून वंचीत राहावे लागले आहे. गट कमांक ४६३ वरील अतिक्रमण हटवून  स्मशान भूमी देण्याचे आदेश नगरपरीषद मूल यांना देण्यात यावे. तसे होत नसेल तर स.सा.क. ४ मधील ख.न. २८२ मधील मोकळी जागा स्मशान भूमी करीता त्वरीत देण्याची कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला निर्देश द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना, रेव्ह. ॲनथोनी परिच्छा, सेंट स्टिफन चर्च मूल, पास्टर महेंद्र बोलीवार, मार्थोमा पॅरिस चर्च, पास्टर सुरेशजी शेंडे आशिर्वाद संगती सेवकाई मूल, पास्टर वसंतजी खोब्रागडे, इमानुअल ग्रेस चर्च मूल,  पास्टर हरिदासजी मेश्राम अनुग्रह, पेंन्टीकास्टल चर्च, पास्टर अशोकजी टिंगुसले ट्रिनेरी चर्च मूल, पास्टर शमुवेलजी उईके, फैन्स फेलोशीप मूल, पास्टर नंदूजी कावळे, अनुग्रह चर्च मूल, पास्टर संतोष ईटकलवार, डॉ मार्टिन अझिम, बाबा अझिम, अॅड. अश्विन पाॅलीकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!