मला घडलेले हिमालय दर्शन
मला घडलेले हिमालय दर्शन
मागच्या आठवड्यात हिमालयातील लेह इथे जाण्याचा प्रसंग आला.भारताचे नंदनवन हिमालयाचे दर्शन होणार म्हणुन खुप आनंद झाला.नागपुरवरुन विमानाने आम्ही लेह येथे पोहचलो. विमानातुन हिमालयाच्या उत्तुंग पर्वतांचे दर्शन घडले.हिमालयाचे दर्शन करून मन कृतज्ञतेने भरून आले.हिमालय पर्वत रांगा आपल्या भारत देशाचे सर्व दिशांनी शत्रुंपासुन रक्षण करतो व आपल्या भारताच्या डोक्यावरील मुकुट म्हणुन पण शोभा वाढवतो.
लेह येथील नीसर्गरम्य स्थळ पाहुन मन एकदम प्रसन्न झाले.निसर्गाने मुक्त हस्ते उधळण इथे केली होती.दोन्ही बाजुंनी उंच उंच पहाड मधातुन जाणारा अरुंद रस्ता ,पहाडातुन गोड आवाज करत वाहणारा झरा,कधी एका बाजुने खळखळ वाहणारी नदी हे सर्व पाहुन मन एकदम प्रसन्न झाले.तिथले वातावरण एकदम शांत व थंड .येथील नयनरम्य स्थळ म्हणजे मुब्रा व्हॅली,पॅनगांग लेक,सींधू नदी,मॅग्नेटींग हिल,मिलिटरी म्युझियम.
चीनच्या बाॅर्डरवर लेह असल्याने तिथे भारतीय जवानांचे दल, भारतीय जवान ठिकठिकाणी दिसत होते. भारतीय जवानांना तिथे नेहमीच सतर्क राहावे लागते. एवढ्या पहाडावर थंड ठिकाणी त्यांना आपल्या भारत देशाचे चिनच्या आक्रमणांपासुन रक्षण करण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे लागते.त्यांना पाहुन खरच मन कृतज्ञतेने भरून जाते. देशाचे रक्षण करण्यासाठी त्यांना केवढा त्याग करावा लागतो आणी जे जवान सीयाचीन ला राहुन जिथले तापमान शुन्य डीग्रीच्या खाली असते अशा ठिकाणी देशासाठी सेवा देतात.अशा जवानांबद्दल आपल्या मनात अभिमान व देशप्रेम जागल्याशिवाय राहत नाही.
अशाप्रकारे हिमालय पर्वत व आपले जवान आपल्या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात.यांच्याकडून आपल्याला देशप्रेम शीकायला पाहिजे व आपल्याला मातृभुमीसाठी काहितरी करण्याची उमंग जागृत करायला हवी.
हिमालय म्हणजे नीसर्गाने मुक्त उधळण केलेले नैसर्गिक सौंदर्य
खरच देवाने स्वतः उपस्थित राहुन हिमालयाची रचना केली की काय असे वाटते.जीवनात एकदा तरी हिमालयाचे दर्शन अवश्य घ्यावे. त्यातच सींधू नदीचे दर्शन, सप्तनद्यांपैकी एक नदी तिच्या स्पर्शाने मन अगदी आनंदित झाले. अशा पवीत्र नद्या आपल्या भारतात आहे याचा खुप अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे.वाईट याचेच वाटते की आपली सींधू नदी वाहत वाहत पाकिस्तान मध्ये गेली.असे नैसर्गिक स्थळ पाहिले की आपला भारतात जन्म झाला याचा गर्व वाटतो .
!! मेरा भारत महान !!
सौ.भारती जीवन कोंतमवार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!