जि.प.उच्च शाळा सावरी (बि)चा अनोखा उपक्रम पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता ५वी चे सर्व विद्यार्थी बसविले परिक्षेत

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - मौजा सावरी बिडकर येथिल जि.प.उ.प्र. शाळेत इयत्ता ५ वी मध्ये एकूण १८ विद्यार्थी असून १८ हि विद्यार्थी परिक्षेत बसविले मागील वर्षापासून जरी कोरोना - १९ मुळे शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी विलास हिवंज मुख्याध्यापक यांनी स्वतः शिष्यवृत्तीचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव करुन घेतला सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. मागील वर्षी या शाळेचे दोन  विद्यार्थी परिक्षेत पास झाले हे‌ विषेश या उपक्रमाचे कौतुक मेश्राम सर गटविकास अधिकारी चिमूर चे विस्तार अधिकारी सौ.सिमा राऊत, तसेच केंद्रप्रमुख अमृतकर सर यांनी केले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शिटीताई सातपैसे ,सौ.मनिषाताई निखाडे उपाध्यक्ष ,रवि शेन्डे , सुरेश मेश्राम यांनी सहकार्य करून मोलाचा वाटा उचलला या उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!