७० कि.मी.अंतर गाठून केले रक्तदान

माणुसकी म्हणजे काय याचा जिवंत उदाहरण राजू शर्मा आणि विदर्भ ब्लड सेवा ग्रुप चे कॉर्डीनेटर सागर इलकर यांनी प्रत्यक्षात घडवून आणला

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक. १० ऑगस्ट २०२१ ला (A) negative या दुर्मिळ रक्तगटाचि गरज भासली असता राजू शर्मा यांनी आपले प्रतिष्ठान ( दुकान ) बंद ठेऊन चिमूर ते ब्रम्हपुरी असा ७० कि.मी. चा अंतर पार करून रुग्णाला नवीन जीवनदान दिले. राजु शर्मा यांचा हा १३ व्या वेळ रक्तदान होता. या मध्ये सागर  इलकर यांनी अत्यंत मोलाचि भूमिका बजावली, सागर यांनी स्वतःच्या गाडीने,  स्व खर्चाने, चिमूर ते ब्रम्हपुरी राजू शर्मा यांना घेऊन गेले. नेहमीच जनसेवेसाठी आणि रुग्णसेवेसाठी तत्पर असणारे सागर इलकर आणि राजू शर्मा यांचे आभार मानतानी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईक यांचे डोळे पाणावले अशा जनसेवे साठी विदर्भ ब्लड सेवा ग्रुप ब्रम्हपुरी आणि नागपूर ग्रुप  नेहमी च सहकार्य करते. यावेळी विदर्भ ब्लड सेवेचे कार्डिनेटर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!