मानव वन्यजीव संघर्ष या विषयावर PRT, व वन समीती यांची कार्यशाळा

नविन PRT team स्थापना करणे संदर्भात चर्चा


तळोधी (बा.):
परिसरातील वाढते वन्यजीव-मानव संघर्ष  या विषयां अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे), तळोधी येथे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री के.आर. धोंडने यांचे अध्यक्षतेखाली आज दि. 15/07/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता वनपरिक्षेत्र  (प्रादे) तळोधी कार्यालय येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, संवेदनशील गावालगतचे सरपंच यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. मानव व वन्यजीव संघर्ष का होतात या बद्दल माहिती सांगत, वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर.धोंडने यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कोनत्या उपाययोजना केल्या पाहिजेत,व PRT व वनव्यवस्थापन समिती यांनी आपापल्या परिसरातील लोकांना हा संघर्ष टाळण्यासाठी कशा प्रकारे दक्षता घ्यावी, व वनविभाग व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून कार्य करीत रहावे. याविषयी कार्यशाळेत 'स्वाब नेचर केअर संस्था'चे अध्यक्ष श्री यशवंत कायरकर यांनी या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन केले. उपस्थितां द्वारे परिसरातील समस्या बाबतीत चर्चा करण्यात आली व नंतर आभार प्रदर्शन क्षेत्र सहाय्यक श्री कार्तिक गरमडे यांनी केले.
यानंतर मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने संवेदनशील गावामध्ये PRT ची स्थापना करण्यात आली.
     या कार्यशाळेत तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील संपूर्ण कर्मचारी, वनरक्षक, वनमजूर,वनसमिती अध्यक्ष, सदस्य, PRT चे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!