पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
गडचिरोली ( प्रतिनिधी )-
झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने यावर्षीपासून गडचिरोली जिल्ह्यातील साहित्य सेवकांसाठी पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. सदर पुरस्कार सन २०२० या वर्षातील प्रकाशित कविता/ बोली वैचारिक/ संकीर्ण लेखनपुस्तकासाठी देण्यात येणार आहे. तसेच लोककलेसाठीही पुरस्कार देण्यात येणार आहे.करीता इच्छूक व्यक्तीनीं आपले साहित्य स्वहस्ते दि.१९ जुलै पर्यंत डाॕ. चंद्रकांत लेनगुरे ,प्रशांती ॲटो सर्व्हिस चामोर्शी रोड साईनगर गडचिरोली (9423646743)या पत्त्यावर आणून द्यावे असे मंडळाचे सचीव कमलेश झाडे यांनी कळवले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!