गरजू विद्यार्थ्यांना सायकल व विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅडचे वितरण
तळोधी (बा.) :
येथून जवळच असलेल्या कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात शिकत असलेल्या ४० गरजू विद्यार्थ्यांना सायकल व इयत्ता ६ ते १० मधील विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅडचे वितरण जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे शनिवारी करण्यात आले. सरस्वती विद्यालयात दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ये-जा करतांना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शेवटी समाजऋण व विद्यार्थीऋण समोर ठेवून जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे ४० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. याशिवाय इयत्ता ६ ते १० मधील विद्यार्थीनी तथा मातांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करुन सॅनिटरी पॅडचे वितरण शनिवारी कार्यक्रमप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व माता उपस्थित होत्या.आरोग्याविषयी मार्गदर्शन डाॅ. नुपूर गोंदे व डाॅ.पायल गोंदे यांनी केले. या वितरणाप्रसंगी नागपूर येथील श्याम बोकाडे, सुलोचना बोकाडे, संस्थाध्यक्ष विजय बारापात्रे, संस्थासचिव मनिषाताई किशोरजी बारापात्रे, उपाध्यक्ष संजय सोनकुसरे, सदस्य रमेश पाटील मस्के,गीताताई बारापात्रे, संकेत व उत्कर्ष बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, निषाद गोंदे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!