संजीवनी फाउंडेशन राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे समारोपीय कार्यक्रम व बक्षिस वितरण सोहळा संपन्न
प्रथम क्रमांक भारतजीवन व्दितीय अक्षय तर तृतीय राहुल
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - सामाजिक चळवळीचे मानबिंदू म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या संजीवनी फाऊंडेशन ने राज्यातील विविध कवी कवयत्री यांना मुक्त व्यासपीठ मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन केल होते या स्पर्धेत एकुन ९० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या समारोपिय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.राजेश पी इंगोले प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर, ये उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर वसंतराव सानप चेअरमन,संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी विविध उदाहरण देत कवी हा कशाप्रकारे आपल्या शब्दातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकतो ये सांगितले.मार्गदर्शक म्हणुन डॉ.पद्मरेखा धनकर काव्य पुरस्कार विजेते, तुशार संतोष शिल्ल्क युवा चेतना पुरस्कार प्राप्त यांनी कवी हा कशाप्रकारे लिहावं, व कोणत्या विषयावर लिहावं ये सांगितले. व त्यांची महाराष्ट्रात प्रसिध्द असणारी "राजा" ही कविता सादर केली. डॉ.विद्याधर बन्सोड सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर मराठी विभाग प्रमुख.यांनी कवितेच्या परीक्षण केलं.व त्यांनी बोलतांना म्हटलं की सर्वच कविता या उत्कृष्ट होत्या.प्रमूख अतीथी म्हणून गोरक्ष चांगदेव भवर, सचिव, संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी संपूर्ण सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. डॉ श्याम खंडारे संचालक राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ यांनी बोलतांना म्हटले की उत्कृष्ट कार्यक्रमाचे अयोजन केले. व भविष्यात गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने व संजीवनी फाऊंडेशन चा वतीने विविध समजिक क्षेत्रात कार्य करू असे सांगितले. डॉ. प्रकाश शेंडे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ.विजय ए सोमंकुवर क्रीड़ा संचालक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर, प्रमोद जी गादेवार सामाजिक कार्यकर्ते, बालकृष्ण कोंगरे इंग्रजी विभाग प्रमुख भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली , डॉ.कुलदीप आर गोंड विभागीय समन्वयक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संजीवनी प्रास्ताविक फाऊंडेशन महाराष्ट्राचे विस्तार समीती अध्यक्ष राजेश बसवेश्वर हजारे यांंनी केले. आणि ते आपल्या प्रास्ताविकेतून म्हटले की संजीवनी फाऊंडेशन ही नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी तत्पर राहणार. व संजीवनी फाऊंडेशन ही भविष्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करणार असे म्हटले. व या कार्यक्रमात संजीवनी फाऊंडेशन नागपुर विभागाचे सहप्रभारी मनिकंठ गादेवार व संजीवनी फाऊंडेशन नागपुर विभागाचे विश्वस्त शुभम निंबाळकर ये उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीवनी फाऊंडेशन चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सूरज चौधरी यांनी केले. या स्पर्धेत चा आयोजनासाठी संयोजन समिती नेमण्यात आली होती. त्या संयोजन समिती मध्ये चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ईजाज शेख,गडचिरोली जिल्हाध्यक्ष सूरज चौधरी संजीवनी फाऊंडेशन गडचिरोली चे उपाध्यक्ष सूरज मोहूर्ले संजीवनी फाऊंडेशनचे चंद्रपूरचे जिल्हा संघटक विश्वजित नायक व जिवती तालुका अध्यक्ष इरफान शेख यांनी या कार्यक्रम योग्य प्रकारे आयोजन करण्यात मदत केली.या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक भारतजीवन चारुदत्त प्रभुखोत जिल्हा कोल्हापूर कवितेच्या शीर्षक "कट"यांना
द्वितीय पारितोषिक अक्षय मारोती इळके जिल्हा कोल्हापूर शीर्षक "नागरिकत्व"यांना व
तृतीय पारीतोषीक राहुल दहिवले "शीर्षक" घुमुटवर्तुळातील थरथरते स्वर..जिल्हा चंद्रपूर यांना देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रज्योत बल्लेवार, आर्यन डोंगरे, लव्हली तुलसानी, कोमल मंडल, श्रध्दा कोहळे, अविनाश छोले रुची टोकलवार इत्यादी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!