तोहोगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे तर कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वांना लसीकरण करणे आवश्यक आहे. म्हणून 18 ते 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करणे आवश्यक आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे लसीकरण केन्द्र नसल्यामुळे नागरिकांचे लसीकरण होते नाही आहे. तोहोगाव वासीयांना इतरत्र जाऊन कोरोना लस घ्यावी लागते आणि त्रास होतो.
त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे कोरोना लस लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी बंडू मधुकर गौरकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले यांच्याकडे निवेदन द्वारे केली. यावेळी श्री सूनील भाऊ उरकुडे क्रुशि सभापति जिल्हा परिषद चंद्रपुर, श्री राजू भाऊ गायकवाड़ जिल्हा परिषद सभापति व श्री धनराज कोवे हे उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!