तालुका काँग्रेस कमिटी तळोधी तर्फे केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली
तळोधी (बा.)(यश कायरकर)
आज दि.१४/०७/२०२१ ला तळोधी , ता.नागभीड काँग्रेस कमिटीच्या वतीने देशात पेट्रोल,डीझेल,गॅस व खाद्य तेल व जीवणावश्यक वस्तूचे दरवाढी विरोधात केंद्र सरकारचे निषेधार्थ शिवाजी चौक तळोधी ते बाजार चौक ते पेट्रोल पंप तळोधी पर्यंत सायकल रॅली काढून व नारे लावुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आले. या वेळी,जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, तळोधी-गोविंदपुरचे जि.प. सद्स्य खोजरामजी मरस्कोल्हे, तळोधी काँग्रेसचे नेते विलासभाऊ लांजेवार डोनुभाऊ पाकमोडे, तालुका युवक कार्याध्यक्ष सौरभभाऊ मुळे, युवानेते सोनुभाऊ कटारे,राहुल गांधी विचारमंच तालुका अध्यक्ष मोनीलभाऊ देशमुख,अमोलभाऊ बावणकर सरपंच येनोली माल, संजयभाऊ अगडे, भारतभाऊ चुनारकर, दिवाकरजी निकुरे, सागर खोब्रागडे सोशल मिडिया प्रमुख गिरगांव,बालुभाऊ शिध्दमशेट्टीवार, भोलाजी कटारे ग्रा.पं. सद्स्य, बल्लुभाऊ गेटेकर,धनंजय ठलाल, पप्पू शेख, मुकेश शेंडे, तुकाराम लोनबले, श्यामभाऊ बागडे, वंदनाबाई चचाणे ग्रा.पं.सद्स्या, रेखाताई मेश्राम ग्रा.पं.सद्स्या,ज्योतीताई मडावी ग्रां.पं. सद्स्या, विजयाताई वाढई ग्रा पं, सद्स्या तळोधी, अक्षय चापरे तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!