विवाहित युवकाने केली आत्महत्या



 
तलोधी बा..  
      लग्नानंतर गंगासागर हेटी येथे घरजवाई  म्हणून राहनार्या 30 वर्षीय युवकाने शेतात कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली आहे.  आशिष मारोती बोरकर (वय 30) असे मृताचे नाव आहे.  10 वर्षांपूर्वी आशिषचे लग्न नागभीड तहसीलच्या गंगासागर हेटी येथील मुलीशी झाले होते.  त्याच्या सासर्‍याला मुलीच, असल्यामुळे ते सासरच्या घरात जमाई म्हणून राहायचे.  
       आज शेजारच्या सावरला गावाजवळ धान शेतात धान्याचा पेरणीसाठी तयार असलेला शेतात त्याच्या मृतदेह आढळला.  त्याची माहिती आज कुटूंबाला मिळाली.  याबाबत नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली.  माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टम करीता नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला.  पीआय खैरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बलदार पठाण, बिहारे, रामटेके, रूपेश घोंगे आदी तपास करीत आहेत.
 आषिश च्या आत्महत्या चे कारन अद्यापही कळले नाही. मात्र त्यांच्या नंतर परिवारावर शोककळा पसरली आहे.त्याचे पच्छात दोन लहान मुली व पत्नी असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!