कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानाला वि.तू. नागपुरेचे नाव द्या
मुल चंद्रपूर रोड वरती,कर्मवीर महाविद्यालयाच्या समोर असलेल्या खुल्या पटांणानाला स्व. वि. तू. नागपुरे क्रीडांगण असे नाव द्यावे.. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
मुल नगरी मधील शिक्षणाचे दारे खुले करून बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणानारे स्व.वि.तू. नागपुरे साहेब यांचा जयंती निमित्त त्यांचा कार्याचा गौरव व्हावा, त्याच्या कार्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने मुल चंद्रपूर रोडवर असलेल्या कर्मवीर महाविद्यालय मुल चा अधिनस्त असलेल्या खुल्या पटांगणाला स्व. वि.तू. नागपूरे क्रीडा पटांगण असे नामकरण करावे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी करणारे निवेदन संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांना देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार व युवक मित्र अमर निकोडे, आतिश निकुरे, विनीत अलुरवार, आदित्य कटकमवार, स्वराज कुंटावार, पवन नागापुरे, शुभम रत्नावार, आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!