फलज्योतिष्य पाठ्यक्रम विरोधात अं.नि.स. तालुका शाखा चिमूर तर्फे तहसीलदार द्वारा मुख्यमंत्र्यांना निवेदन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.19 जुलै  2021इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी फलज्योतिष हा पाठ्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय अवैज्ञानिक असून वैज्ञानिक दृष्टीकोणाला दडपण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न आहे . यामुळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति तालुका शाखा चिमूर चे वतीने चिमूर तहसील चे तहसीलदार द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना आज दिनांक 19 जुलै 2021 ला फलज्योतिष हा पाठ्यक्रम इग्नूने सुरू करू नये यासंदर्भातील निवेदन देण्यात आले .
       अनेक महापुरुष आणि थोर विचारवंत या भारत भूमीत जन्मले आहेत तसेच महाराष्ट्रातील शेकडो वर्षापासून ची थोर संतांची परंपरा कर्तुत्वाला मान्यता देणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची  कारकीर्द विचारधारा व धोरण फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या या भुमीकडे जग आदराने पाहते  पुढील पाच मिनिटात आपल्यावर काय संकट येणार आहे किंवा काय शुभ घडणार आहे हे सुद्धा कुणी सांगू शकत नाही तर दहा वीस पन्नास वर्षानंतर आपल्या आयुष्यात काय घडणार आहे हे सांगणारे ज्योतिष्य किती थोतांड आहे अशा पद्धतीचा विचार व्यक्त करणारे स्वामी विवेकानंद तसेच एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा पास होण्यासाठी ग्रहताऱ्यांची नव्हे तर अभ्यासाची गरज असते हे सर्वांनाच पटेल जगातील 186 वैज्ञानिकांनी ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे स्पष्ट  केले आहे तसेच  कोणताच ज्योतिष्य वक्ता कोणालाही तंतोतंत खरं ज्योतिष्य सांगू शकत नाही ज्योतिषा साठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 38 वर्षापासून पुर्वी एक लक्ष तर वाढत वाढत हल्ली 25 लाखाचे ज्योतिष्य सिद्ध करण्याचे आव्हान टाकले आहे परंतु 38 वर्षात आज पर्यंत कोणीही ते आव्हान पूर्ण केले नाही तरी सुद्धा इग्नू ज्योतिषाला शास्त्र मानून हा पाठ्यक्रम सुरू करत आहे .
    फल ज्योतिष पाठ्यक्रमात येणे म्हणजे युवापिढीच्या डोक्यात ज्योतिष्य भरवून त्यावर प्रबळ विश्वास संपादित करणे होय यातूनच दैववाद हा निर्माण होतो आणि दैववादाने माणूस हा अंधश्रद्धाळू व दुबळा बनतो कर्तुत्वावर आणि प्रयत्नावर आळा बसते मानवी विकासाची चालना खुंटते यासाठी शैक्षणिक पाठ्यक्रमात ज्योतिष शास्त्र हा विषय देशासाठी देशातील जनतेसाठी घातक आहे असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समिति तालुका शाखा चिमूर चे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
       यामुळे फलज्योतिष्य हा हा पाठ्यक्रम शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येऊ नये यासंदर्भातील निवेदन अनिस तालुका शाखा चिमूर तर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे यावेळी चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनवले यांचे मार्गदर्शनाखाली तालुका संघटक सारंग भिमटे , अध्यक्ष प्राध्यापक संजय पिठाडे ,  प्रसिद्धीप्रमुख अमोद गौरकार , सदस्य राजकुमार चूनारकर ,नरेंद्र नगराळे ,चुन्नीलाल कुडवे ,रवींद्र गोंगले हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!