चिमूर नगर परिषद क्षेत्रात स्वच्छतेचे वाजले तीन - तेरा

काँग्रेस कार्यकर्ते पप्पू शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद क्षेत्रात पावसाळा बघता विविध प्रकारच्या रोगांची साथ सुरु आहे. प्रभागातील नाल्या वेळेवर उपसा होत नाही. पावसाचे पाणी त्यामध्ये साचून राहते व सदर ठिकाणी दुर्गंधी निर्माण होते.कोरोनाचे दिवस बघता नगर परिषद क्षेत्रामध्ये डेंगू या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येत आहे. सदर आजारामुळे नागरीकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहचू शकते. याकडे आपले लक्ष वेधून योग्य त्या प्रकारे स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आपण जर नगरातील नाल्या वेळोवेळी स्वच्छ केल्या तसेच पावसाळ्याच्या दिवसात या डेंगू च्या मच्छरांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. जर आपण फवारणी व नाल्यामध्ये फवारणी केली तर नागरीकांच्या आरोग्यास धोका पोहचणार नाही. जर आपण या संपूर्ण गोष्टी केल्या नाहीत डेंगू या रोगामुळे नागरीकांचा जिव गेला तर यास सर्वस्वी जवाबदार नगरपरिषद चे मुख्याधिकारी राहिल असा निवेदनाच्या माध्यमातून इशाराही यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!