वरूनराजा नाराज बळीराजा चिंतेत.. परिसरातील रोवण्याची कामे खोळंबली...



शंकरपूर (जगदिश पेंदाम) 
सुरुवातीला रोहिणी व मृग नक्षत्रात जोरदार पावसाची सुरुवात झाली आता पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे..
कोरोणा महामारी सोबत मुकाबला करताना आपल्या शेतीच्या मातीत घाम गाळून खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी केलेली सर्व प्रकारची तडजोड करून पिके पेरणी केली गेली सोयाबीनचे बियाणे 130 रुपये किलो याप्रमाणे कपाशी, तूर,धान बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी केली सुरुवातीला जोरदार पडलेला पाऊस आता मागील एक हप्ता पासून  परिसरात गायब झाला असून त्यामुळे कर्ज काढून शेती करणारा शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. मागील वर्षी विमा कंपनी यांनी केलेली फसवणूक बोगस बियाणेमुळे झालेले नुकसान कापूस, तूर ,धान यावर आलेल्या या रोगामुळे संकटातून सावरत नव्याने शेतीची सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने सुद्धा चिंतेत टाकले आहे परिसरातील आंबोली, हिरापूर, डोमा, डोंगरगाव,चकजाटेपार कवडसी, दहेगाव, झरी आजगाव, पाचगाव, खैरी,जवराबोडी, साठगाव, कोल्हारी, गावामध्ये पेरणी झाली असून धान् रोवणीला सुरुवात झाली मात्र पाऊस पडत नसल्यामुळे पावसामुळे रोहिणी थांबली असून शेतकरी चिंतातुर दिसून येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!