नागभिड नगर परिषदेने ठरावाची अंमलबजावणी न केल्यामुळे प्रहार सेवक यांनी नगर परिषद समोर कोविड - १९ चे नियम पालन करून ठरावाची केली होळी
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - नागभिड नगर परिषद च्या मुजोरी कारभारामुळे दिनांक. ०१/०६/२०२१ रोजी १२ वाजता सकाळी १२ चक्का ट्रक आला असता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची या माल वाहतूक चालकावर कार्यवाही करण्यात आली नाही.नगरपरिषद ठराव मध्ये सकाळी ७ ते ९ वाजता पर्यंत मोठे वाहन येण्यास पाबंदी राहील असे ठरावात नमूद केले आहे. तरी पण नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी दूतराष्ट्राची भूमिका पाळत आहे. नगर परिषद चे अधिकारी या नियमांना पाळत नसल्यामुळे दिनांक. ०२/०७/२०२१ रोजी दुपारी २ वाजता नगरपरिषद कार्यालया समोर ठरावाचा प्रतीची कोविड नियमानुसार दहन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड यांनी दिला असता ठरावाच्या प्रतीची होळी करण्यात आली. यावेळी वृषभ खापर्डे प्रहार सेवक , विक्की फुल्वानी,शेखर भाऊ फटीग ,अक्षय खोब्रागडे, रोहित कुमंरे व इतरही प्रहार सेवक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!