पान्होळी येथे बिबट मादीचा युवकावर हल्ला; वनविभागाचा कर्मचारीही जख्मीं
नागभीड वनपरिक्षेत्रातील, पान्होळी येथे दोन घराच्या मध्ये ठाण मांडून बसलेल्या बिबट मादीने घरातून बाहेर पडलेल्या सुधीर गुरपुडे (30) या युवकावर रात्री हल्ला केल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. यानंतर गावकऱ्यांनी लागलीच वनविभागाला माहिती दिली.. वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड आपल्या कर्मचाऱ्यासह घटना स्थळी सोबत झेप निसर्ग मित्र संस्थेचे उपाध्यक्ष अमोल वानखेडे व क्षितिज गरमडे यांच्या सोबत पोचले. या बिबट मादीला रात्री पिंजऱ्यात जेरबंद करण्याची मोहिम सुरू असताना अचानक पणे वनविभागाच्या राहुल वगारे नामक वनरक्षकावर हल्ला करून बिबट पसार झाले. या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले.
या सदर ठिकाणी लागून असलेल्या आंबोरकर यांच्या बंद असलेल्या जुन्या वाड्यात सकाळी एक गावकरी साफ सफाई करत असताना बिबट चे दोन बछडे दिसून आलेत लगेच याची याची माहिती वनविभागाला देण्यात आली.सदर ठिकानाहून वनविभागाने दोन्ही बछड्याना आपल्या ताब्यात घेत त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले.
सदर ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मादी बिबट ठाण मांडून बसली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर बछड्यांचे वय अंदाजे 1 ते 1.5 महिन्याचे आहे. बिबट मादीच्या या आक्रमकतेमुळे गावात भीती चे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने लवकरात लवकर बिबट ला जेरबंद करावे अशी मागणी धास्तावलेल्या ग्रामस्थाकडून होत आहे.
पिल्ले असल्याने मादा बिबट पुन्हा गावाकडे परत येनार. मात्र त्या बिबट ला जोरबंद करून योग्य सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार. मात्र गावकऱ्यांनी शांतता राखुन वनविभागाला सहकार्य करावे. नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी श्री महेश गायकवाड व त्यांची चमू गावात असुन परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!