समस्या रहित बामसेफ चे कार्यकर्ते लोकाधिकारासाठी जागरूक ः- डॉ. अभिलाषा गावतुरे.


चंद्रपूर जिल्हा बामसेफ अधिवेशन ऑनलाईन संपन्न झाले.
बल्लारपूर (वसंत मुन) 
  अध्यक्षता मू.प्रोफे. मधुकर मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य नागपूर यांनी केली. उद्घाटन मू.प्रा.विठ्ठल आत्राम शिवाजी महविद्यालय,राजुरा यांनी केले.या प्रसंगी ते म्हणाले की क्रुतीप्रवण संघटणा म्हणजे बामसेफ असुन मूलनिवासी बहुजन समाजाला आशेचा किरण असल्याचे सांगितले. मू.डॉ. प्रिया कदम,सामाजिक चिंतक व सामाजिक कार्यकर्ते, वर्धा,यांनी प्रत्यक्ष भातिय संविधान आणि लोकं यांच्या संदर्भात प्रत्यक्ष अनुभव कथन केले. मू.पंकज जांगडेकर, जिल्हा संघटण सचिव बामसेफ, चंद्रपूर,यांनी भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा, संवर्धन करण्याची गरज व त्यातील लोकांचे अधिकार आणि भारतीय संविधान लोकाभिमुख होण्यासाठी करायचे कार्यावर प्रकाश टाकला. मू.डॉ. अभिलाषा गावतुरे मैम,सामाजिक चिंतक व पेशाने डॉक्टर यांनी कोविद 19 महामारीत लोकांच्या समस्या आणि सरकारची जबाबदारी या विषयावर प्रकाश टाकला. त्या पुढे म्हणाल्या की बामसेफ चे कार्यकर्ते,ज्यांच्या समस्या नाहीत परंतू सामाजिक भान ठेऊन मूलनिवासी समाजातील लोकांसाठी काम करतात व संवैधानिक भारत निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत आणि म्हणून समा बामसेफ कडे मूलनिवासी बहुजन समाज सामाजिक परिवर्तनाच्या आशेने पहात असल्याचे सांगितले.
  मू.प्रोफे.मेश्राम म्हणाले की संवैधानिक भारत निर्मिती साठी बामसेफ कटिबद्ध असुन लोक-जागृतीचे काम दैनंदीन चालु असल्याचे सांगितले.
  प्रास्ताविक मू.दिवाकर मडावी, जिल्हाध्यक्ष बामसेफ चंद्रपूर यांनी तर संचलन मू.देवानंद रायपुरे जिल्हा महासचिव बामसेफ यांनी केले.या प्रसंगी मू.कविता मडावी,राज्य उपाध्यक्ष बामसेफ या प्रमुख्याने उपस्थित होत्या.आभार मक्कम चे राज्य कार्यकारिणी सदस्य मू.महेंद्र खंडाळे यांनी मानले.सदर जिल्हा अधिवेशन दि.4/7/2021 ला संपन्न झाले. जिल्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जुळले होते.साव सर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!