विहिरगाव येथील २२ वर्षीय मुलाने गळफास घेत केली आत्महत्या

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील रोशन महादेव दडमल २२ वर्ष असे या मुलाचे नाव आहे.विहिरगाव येथील टेलरिंग चा व्यवसाय करणाऱ्या महादेव दडमल यांचा तो एकुलता एक मुलगा आणि एकच मुलगी आहे.रोशन पदवीधर होता.रोशन सायंकाळी घरात खोलीत ऑनलाइन अभ्यास करीत आत ,आणि आज दिनांक.११ ला  सकाळी ११ वाजता त्याची आई आणि बाबा शेतावर गेले होते.त्याच वेळेस घरी कोण्ही नसताना दोरीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.प्रेत शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!