चंद्रपूर जिल्हा सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र लोंढा यांची निवड

चंद्रपुर जिल्हा सराफा असोसिएशन अध्यक्ष पदाची निवडणूक संपन्न
श्री. राजेंद्रजी लोढा यांची नियुक्ती


आज दिनांक 11/7/2021 रोजी चंद्रपूर जिल्हा सराफा असोसिएशन अध्यक्ष पदाची निवडणूक स्थानिक यंग रेस्टारंट हॉटेल येथे संपन्न झाली. या मीटिंग मध्ये लोकतांञीक पद्धतीने निवडनुक घेण्यात आली.
या निवडणुकीत चंद्रपुर जिल्हा सराफा असोसिएशन अध्यक्ष पदाकरीता श्री. राजेंद्रजी लोढा यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री मधुकर रावजी गोडे निवडणूक अधिकारी श्री भरत भाऊ शिंदे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्री ओम प्रकाश जी सोनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना शहर सचिव श्री मनोज डोमाळे यांनी केली. आणि मंच संचालन श्री विनोद रावजी घोडे यांनी केले या कार्यक्रमाला आशुजी सागोळे, रोशन जी कोठारी, सत्यम
सोनी, भिवराज कुकरा, संजय सराफ,मितेश लोडिया, विनय जैन विजय चांडक प्रमोद जी लूनावत विठ्ठल मुडपल्लीवार व या कार्यक्रमाला भद्रावती वरोरा चिमूर नवरगाव नागभीड ब्रह्मपुरी तळोधी सावली सिंदेवाही मुल पोंभुर्णा बल्लारशा राजुरा कोरपना गडचांदूर जिवती घुगुस गोंडपिपरी या सर्व तालुक्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित
होते. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपुर शहर सराफा असोसीएशनने केले. नवनिर्वाचीत अध्यक्ष राजेंद्रजी लोंढा यानी नियुक्ती बद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!