नागभिड येथे राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप व वृक्ष लागवड
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री, अपंग, शेतकरी, शेतमजूर, सामान्यांचे आधारस्तंभ, लोकनायक, आदरणीय वंदनीय कार्यसम्राट नामदार बच्चू कडू यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा देत नागभीड येथील शासकीय रुग्णालय येथे प्रहार सेवकांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच फळे वाटप करण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासन उपस्थित होते तसेच रुग्णालयातील अधिकारी सुद्धा उपस्थित होते. नागभीड तालुक्यातील प्रहासेवक प्रहार जनशक्ती पक्ष वृषभ खापर्डे प्रहार सेवक , सुरेशजी कोल्हे , विक्की फुल्वानी,शेखर फटीग निलेश डोमडे, दीपक मानुसमारे, राहुल दडमल, अक्षय खोब्रागडे, निखील मेश्राम,रोहित कुमरे, रोहित चौधरी, वैभव लांडेकर ,आदेश निशाने या वेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!