गिरोला येथे चक्रीवादळात झालेल्या नुसकानाचे अनुदान त्वरित अदा करा प्रहार सेवक यांचे तहसीलदारांना निवेदन

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - ४ जून २०२१ शुक्रवार ला ३ वा. च्या  सुमारास १० दिवसांपूर्वी वरोरा तालुक्यातील गिरोला येथे अवकाळी - वादळी पावसामुळे  गिरोला वाशीयांचे मोठे नुकसान झाले या वर्षी कोरोना विषाणू - १९ मूळे गावातील नागरिक या लढाई ला सामोरे जात असताना अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे गिरोला येथिल शेत मजूर व शेतकरी यांचे अवकाळी वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. या वादळाचा वेग ईतका प्रचंड होता कि गावातील २५ ते ३० घरावर चे टिनचे छप्पर परिपूर्ण ऊळून गेले. तसेच  गिरोला वाशीयांचे अवकाळी पावसामुळे घरावरचे छप्पर उळाल्याणे अनाज व खात बि - बियाणे यांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. म्हणून  शासनाकडून मोक्का पंचनामा केला. पण आर्थिक मदत नुसकानग्रस्त नागरिकांना अजूनही मिळाली नाही.तरी लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी प्रहार सेवक शेरखान पठान, प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या उपस्थितीत वरोरा येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रहार सेवक मेघश्याम दाबेकर बालाची खिरटकार, निखिल खिरटकार, मंगेश घानोडे, दिलीप काळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!