चिचाळा येथे घरगुती नळ जोडणीच्या कामाला सुरुवात
चिचाळा येथे घरगुती नळ जोडणीच्या कामाला सुरुवात
मूल (अमित राऊत )
पंचायत समिती मूल अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चिचाळा येथे केंद्र शासन पुरस्कृत 'जल जीवन मिशन' योजनेअंतर्गत घरगुती नळ जोडणीच्या कामाला दि. 20 जून रोजी सरपंच जास्मिताताई लेनगुरे, उपसरपंच सुरज चलाख, रेखाबाई प्रभाकर निकेसर, वर्षा संजय लेनगुरे, सौराज सुरेश ईटकलरवार यांच्या शुभहस्थे भूमिपूजन करून सुरवात करण्यात आली.
15 वा वित्त आयोग अर्थसहाय्यीत बंधीत निधी अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला घरगुती नळ जोडणी द्यावयाची आहे. ग्रामपंचायत चिचाळा येथे सण 2020-2021 मध्ये ग्राम चिचाळा येथे 257 आणि ग्राम कवळपेठ (रै) व (माल) येथे 30 नळ जोडणी मंजूर आहेत.
सदर नळजोडणीच्या कामाला प्रभाग 2 मध्ये भूमिपूजन करून सुरुवात झालेली असून लवरच नळ जोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी जलसुरक्षक मनोज कोतंमवार, संजय गेडाम, राजु वैरागडे, नळ जोडणी करणारे प्लंबर्स तथा चिचाळा येथील प्रभाग 2 चे नागरीक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!