"पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

"पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" संस्थेच्या वतीने  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.


पोंभूर्णा :- "योग" हा जीवनशैलीचे महत्त्व लोकांना समजून यावे याकरिता गेल्या ५ वर्षांपासून २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज जागतिक योग दिवस या दिवसाचे औचित्य साधून "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे अविनाश लेनगुरे हे संस्थेचे सभासद असून त्यांनी या पूर्वी योग शिबिर मध्ये सहभाग घेतलेला आहे . आणि आज आंतरराष्ट्रीय योग  दिवस असल्याने उमरी पोतदार या गावाततील लहान मुलांना व संस्थेच्या सर्व युवकांना  योग शिकवण्यात आला व "योग" केल्याने  आपले मानसिक व शारीरिक आरोग्य कसे सांभाळावे व आपल्या बौध्दिक क्षमतांचा पुरेपूर वापर कसा करून घ्यावा या संदर्भात अविनाश लेनगुरे यांनी मार्गदर्शन केले.
थोडक्यात :- आपल्याला शक्य होत असेल तर  प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेच्या वतीने केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!