प्लाझ्या दान करा कोरोना रूग्नांचा प्राण वाचवा

कु.सिमा अ. राऊतपाटील यांनी सेवाव्रत बहुदेशिय संस्थेतर्फे केले आव्हान 


नागभीड:(यश कायरकर) 
समाजात चालत असलेल्या कोरोना विषाणुमुळे रुग्नांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.कोरोणाच्या दुसर्या टप्प्यात मृत्यु होत आहे. कोरोना या रोगावर प्लाझ्मा थेरपीव्दारे रुग्नांना आधार दिला जातो व प्राण वाचु शकतो..
कोरोना रूग्नांसाठी प्लाझ्मा थेरीपी ही वरदान असुन अनेक रूग्नांचे या थेरीपीने प्राण वाचत आहेत...कोरोना रूग्नाचे प्राण वाचविण्याकरीता पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन "सेवाव्रत बहुदेशिय संस्था" तथा "माईकट्टा महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्ठान.च्या संस्थापिका,अध्यक्ष कु. सिमा अ. राऊतपाटील यांनी केलेले आहे.
थेरीपिव्दारे कोरोणातून बरा झालेला रूग्णांचा रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातिल कोवीळ विरूध्द अॅंटीबाॅडी दुसर्या रूग्नाला दिल्या जातात..त्यामुळे रूग्नांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का होईना शक्य आहे मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून पूर्णत: बरे झालेले रूग्न समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्नांवर याव्दारे उपचार करणे वैद्यकिय अधिकार्यांना प्रश्न पडत असतो..एक प्लाझ्मा दानातून दोन रूग्न बरे होऊ शकतात..त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करन गरजेचे आहे.अनेक ब्लड बॅंकेत काही कोरोणातून बाहेर आलेल्या रूग्नांनी समोर येऊन प्लाझ्मा दान केलेला आहे.....त्यामुळे सेवाव्रत बहुदेशिय संस्थेव्दारे रुग्नसेवा प्लाझ्मा डोनर शोधत आहेत..राज्य शासनाने कोरोना उपचारांसाठी रूग्नालयांना प्लाझ्मा थेरिपी उपचार पध्दतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने ही तयारी सुरू केली आहे...रूग्न कोरोनाबाधित झाल्यानंतर २८ दिवस ते चार महिणाच्या कालावधित कोरोंना बाधित रूग्न बरा होऊन प्लाझ्मा दान करून ईतर दोन व्यक्तिचे जीव वाचवू शकतो.त्यामुळे प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावून कोरोना रूग्नाचे प्राण वाचवावे असे आवाहन "सेवाव्रत बहुदेशिय संस्थेच्या, अध्यक्ष कु. सिमा अ. राऊतपाटील यांनी केलेले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!