तळोधी ( बा.) येथे कोविड चाचणी केंद्राचे उद्घाटन




तलोधी (बा)(यश कायरकर) 
                 नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) हे अप्पर तहसील कार्यालय असलेले सर्वात मोठे गाव असुन या परिसरातील नागरिकांना २० किमी. हुन अधिक अंतरावरील नागभीड येथील केंद्रात कोविड चाचणीसाठी जावे लागत होते . अनेक रुग्णांना इच्छा असुनही वाहन व इतर सोयी अभावी कोविड चाचणी करून घेण्यात अडचणी येत होत्या . नागरिकांची ही अडचण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तळोधी (बा.) येथे कोविद चाचणी केंद्राला मंजुरी मिळाली.
                   नागपूरच्या खाजगी लँब द्वारे या केंद्रात रोज सकाळी ९ ते दुपारी २  वाजेपर्यंत RTPCR ची निशुल्क चाचणी होणार असुन दुसऱ्याच दिवशी सकाळी चाचणी अहवाल प्राप्त होणार आहे. आज तळोधी ( बा.) येथील जि.प.कन्या शाळेच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या या चाचणी केंद्राचे उद्घाटन सरपंच सौ.छाया मदनकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्य खोजराम मरसकोल्हे व संजय गजपुरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, डॉ. जयदीप राठोड , उपसरपंच राजेश घिये , ग्रा.पं.सदस्य नरेश खोब्रागडे , विलास लांजेवार, विवेक सयाम, सोनु नंदनवार, डोणुजी पाकमोडे , भोला कटारे पत्रकार संघाचे महेश काशीवार व मोनिल देशमुख यांची उपस्थिती होती.
              परीसरातील कोविद रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागभीड तालुका आरोग्य विभागातर्फे आगामी ३ दिवस याच केंद्रावर रँपीड अँंटीजन टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे. सकारात्मक चाचणी आलेल्या कोविद रुग्णांसाठी स्थानिक लोक विद्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने व डॉ. जयदीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे. 
              या चाचणी केंद्रावर ग्रामपंचायत च्या वतीने पिण्याच्या पाण्याची व रुग्णांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून भाजपातर्फे मास्क चे वाटप करण्यात येत आहे. सदर कोविद RTPCR चाचणी केंद्र सुरु केल्याबद्दल तलोधी (बा) ग्राम पंचायत चे तथा जिल्हा प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!