शंकरपूर मध्ये कोव्हिड सेंटर, अँटीजेन व RTPCR चाचणी सुरु करण्यात यावी.. उपसरपंच अशोक चौधरी यांची मागणी...
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव त्यातच शंकरपूर परिसरात कोरोनाचा वाढता संचार लक्षात घेता शंकरपूर येथे कोविड सेंटर व कोरोना चाचणी सुरू करावी.
शंकरपूर अंतर्गत३४ खेडे असून शंकरपूर ची लोकसंख्या १० हजारावर आहे त्यातच शंकरपूर येथे कोरोनाच्या कोणत्याही सोई नसल्यामुळे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर जावं लागते पण जाण्यायेण्या करीता संचार बंदी असल्यामुळे कोणतेही साधन नसून वयोवृद्ध व इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो व खेड्यातील जनता चिमूर येथे जाऊ शकत नाही ही बाब लक्षात घेता शंकरपूर येथे कोरोना सेंटर विलगीकरण करिता आवश्यक इमारत व हॉल उपलब्ध असून संबधित विभागाने शंकरपूर येथे कोव्हिड सेंटर व अँटीजेन चाचनी करण्याची सोय उपलब्ध करून यावी अशी मागणी ग्रा.पं शंकरपूर चे उपसरपंच अशोक ज्ञा. चौधरी यांनी केली आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!