कोरोनाच्या काळात लाॅकडाऊनचा फायदा घेत किराणा दुकानदार करतोय ग्राहकांची लूट

ग्राहक मंच झोपेत

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमुर तालूक्यात कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा फायदा घेत किराणा दुकानदार  ग्राहकांची भरमसाठ लूट करीत आहे.आज अशी कोरोनाची महामारी आणि या भयानक महामारी मध्ये जनतेकडून सर्रासपणे लूट होतांना दिसत आहे. याचाच फायदा किराणा दुकानदार पुर्ण पने फायदा घेत आहे. लॉकडाऊन मुळे सर्व प्रकारच्या कंपनी कारखाने व दुकाने बंद राहणार असे पत्र वॉट्सअप च्या माध्यमातून बघायला मिळत आहे. या चर्चेला उधाण आले असून ग्राहकांची किराणा दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली बघता किराणा दुकानदार ग्राहकांना आताच जास्तीतजास्त किराणा खरेदी करा समोर मिळणार नाही असे बोलीत मोठ्या प्रमाणावर जास्त दराने मालाची विक्री केली जात आहे.व आम्हा किराणा व्यावसायिकांनाच माल येत नाही तर तुम्हाला कुठून देणार अश्या प्रकारची ग्राहकाना एक चुकिचा संदेश देने सूरु असल्याचे दिसुन येत आहे.आणि या संदीचा फायदा घेत दुकानदार ग्राहकांची लूट करीत आहे असे दिसते. याकडे ग्राहक मंचाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.व यावर जिल्हाधिकारी सुध्दा काहीच वक्तव्य करीत नाही आहे.मागील वर्षी सुद्धा किराणा दुकानातील साठा अपुरा पडेल अशी अफवा पसरवून जनतेला चुकिचा संदेश दिला होता.असेच सुरू राहिले तर काय कायदा आणि काय सुव्यवस्था ? असे चित्र निर्माण होईल म्हणून प्रशासनाने तात्काळ लक्ष याकडे देऊन या चुकिच्या मार्गाने व्यवसाय करणारे व चुकिची माहिती पसरविणाऱ्यांवर करवाही करायला हवी. अशी सध्याजनते कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!