क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले जयंती साजरी

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले जयंती साजरी


प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर , मूल

 मूल:- कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टटिंग पाळत आज भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांची जंयती महात्मा जोतिबा फुले चौक मूल येथे अगदी साध्या स्वरुपात साजरी करण्यात आली.
महात्मा फुले यांचे सामाजिक सेवेचे प्रेरणा घेत कोरोना पासून स्वतःचा बचाव कसा करायचा आणि शासनाच्या राबवित असणाऱ्या योजनेविषयी जन जागृती केली.   कार्यक्रमाला  प्रशांत समर्थ , राकेश मोहूर्ले , अशोक निकुरे, राकेश ठाकरे, प्रमोद म्हाडोळे, शुभम निकुरे, प्रतिक गुरुनुले आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!