श्रावणबाळ योजनचे अनुदान त्वरीत अदा करण्याबाबत प्रहार सेवक यांचे तहसिलदारांना निवेदन

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - दिनांक.०१/०४/२०२१ गेल्या मागील काही महिन्यांपासून श्रावणबाळ योजनचे अनुदान थकबाकी असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे . अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालयत तसेच बँकेच्या चकरा मारीत आहे,मात्र रक्कम न आल्याने आल्यापाऊली त्यांना परत जावें लागत आहे.श्रावणबाळ योजनेचे अनुदान त्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे या करिता प्रहार सेवक,विनोद उमरे यांनी तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले व तहसिलदार नागटीळक साहेब यांनी सोमवार पर्यंत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येईल असे प्रहार सेवक यांना आश्वासन दिले त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक , मुरलीधर रामटेके, प्रहार सेवक, आदीत्य कडू प्रहार सेवक, स्वप्नील खोब्रागडे, प्रहार सेवक, सचिन घानोडे, प्रहार सेवक, नारायणन निखाडे, प्रहार सेवक प्रशांत कडवे उपस्थित  होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!