लॉकडाऊन काळात ग्रंथपालांनी वाचनालयात चिकटवहिचा केला स्तुत्य उपक्रम सादर

तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - विठ्ठल दत्तात्रय शतपलकर शिपाई (प्र.ग्रंथपाल) व्यंकटेश नगर वाचनालय , नगर परिषद राजुरा यांचा लॉकडाऊन काळातील चिकटवही चा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल.ते  इमानेइतबारे ग्रंथालय चालवितात.सुट्टीच्या दिवशी पणं सकाळी उघडून वाचकांना पेपर वाचायला देतात.तसेच सध्या या वाचनालयाचा अभ्यास कक्ष म्हणून सुध्दा मुली-मुलें याचा चांगला वापर करीत आहेत.यासाठी नगर परिषदेचे अध्यक्ष अरूण धोटे यांचे विषेश सहकार्य लाभले आहे.व्येंकटेश वाचनालय हे आंबेडकर चौकातील एकमेव वाचनालय असल्याने आणि या वाचनालयाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आल्याने याचे वाचनालय व अभ्यासिकेत रूपांतर करण्यात यावे अशी विद्यार्थी वर्गांची व सृजन नागरिक मंच, राजुरा ची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!