जिल्हा परिषद विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) संघटनेचे अध्यक्षपदी देवाभाऊ उराडे यांची अविरोध निवड

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्याच्या विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) या संघटनेची सभा दि. ०९/०४/२०२१ रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही येथे आयोजीत करण्यात आली होती. या सभेत जिल्हा कार्यकारीणीची व अध्यक्ष व सचिवांची निवड आली असता अध्यक्षपदी एकमताने देवाभाऊ उराडे व सचिवपदी राजू राईंचवार यांची निवड करण्यात आली. सभेला सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणालकुमार उंदीरवाडे हे उपस्थित होते. दरम्यान सिंदेवाही पंचायत समितीचे तत्कालीन विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) नाकतोडे हे नियत वयोमानानुसार पदावरुन सेवानिवृत झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन राजू परसावार विस्तार अधिकारी यांनी केले. व आभार प्रदर्शन बैनलवार विस्तार अधिकारी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!