चोर सोडून संन्याशाला फाशी!
रेती आणणारा ट्रॅक्टर पकडून केलेली कारवाई म्हणजेच 'चोर सोडून संन्याशाला फाशीच!'
तळोधी (बा.) यश कायरकर.
रोज रात्रभर गावातून दहा-वीस ट्रॅक्टर रेती चोरणाऱ्यांना अभय, मात्र चुकीच्या व्यक्तीवर केलेल्या कारवाईबद्दल , रेती माफिया व पोलीस कारवाई बद्दल गावातील जनतेत असंतोष आत्ता आम्हीच करनार रेतिमाफीयांवर कार्यवाही.
'मिलीभगत मुळेच रेती तस्करांना सोडून गरजूंनी आणलेली रेती पकडून करतात कारवाई व याकरिता रेती तस्करच पुरवितात माहिती ' असे लोकांचे मत.
चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय लिलाव न झाल्यामुळे घराचे बांधकाम करणारे व शासकीय बांधकाम, बंधारे, रस्ते बांधकाम, पुलिया बांधकाम, याकरिता रेतीचा फार मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याचीच संधी साधून जिल्ह्यात अवैध दारू विक्री नंतर सर्वात मोठा चोरीचा धंदा म्हणून काही दबंग लोकांनी रेतीचोरी हा व्यवसाय निवडला. व त्यात त्यांनी संबंधित काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हा व्यवसाय खुलेआमपणे सुरू केलाय. या व्यवसायामुळे काही अधिकारी सुद्धा आपल्या तिजोर्या भरत आहेत. मात्र लिलाव न झाल्याने जिल्ह्याच्या तिजोरी मध्ये येणारा राजस्व मोठ्या प्रमाणात बुडालेला आहे . या चोरीमुळे परिसरात पर्यावरण व लोकांसाठी ही मोठी संकटच निर्माण झालेली आहे. नदीपात्रातील रेती अवाजवी उपसा करन्यात आल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी एकदमच खालावलेली आहे. त्यामुळे नदी लवकरच कोरडी होते. तर नदीत कुठेच पाणीसाठा राहत नाही. व रात्रभर भरधाव चालणाऱ्या तस्करांच्या ट्रॅक्टर मुळे अपघाताचे प्रमाणातही वाढ झालेली आहे.
अशीच तळोधी बाळापुर हद्दीत मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू आहे आणि आता तर पळसगाव -तळोधी - सावरगाव - वाढोणा- चिखलगाव या गावालगत वाहणारी बोकोडोह नावाची हि नदी तस्करांची वतनदारी ठरत आहे. आत्ता तर या नदीच्या घाटांची नावे तस्करांच्या नावाने ओळखली जात आहे. त्यामुळे जणू काहीही नदी, रेती तस्करांच्या नावाने शासनाने केलेली आहे असा आव ते आणतात .मात्र जर या परिसरात कुणी गरजू व्यक्तीने आपल्या बांधकामाकरिता स्वतःच्या किंवा कुणाला ट्रॅक्टर मागून बांधकामाकरिता थोडी आवश्यकता नुसार रेती आणण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल माहिती पुरवून त्यांचे वाहन पकडून दिले जाते.
असीच एक कार्यवाहीत रेती आणणाऱ्या दिनेश देविदास बोरकर यांच्या ट्रॅक्टर जप्तीची कारवाई तळोधी बा. स्टेशनचे ठाणेदार व पोलिसांनी 3 एप्रिल ला सावरगाव हद्दीत केली. मात्र या माहितीच्या आधारे व अनभिषिक्त पणे करण्यात आलेल्या ट्रॅक्टर जप्तीच्या कारवाईत 'चोर सोडून संन्याशाला फाशी' हीच मन पुरेपूर लागू होते.
सविस्तर म्हणजे सावरगावातील एका बोरकर परिवाराला घरकुल मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्याला बांधकामाकरिता रेतीची अत्यंत आवश्यकता आहे मात्र रेती घाट लिलाव झाला नसल्याने सरळ मार्गाने रेती उपलब्ध होणे अशक्यच व रेती तस्करांचेकडून महाग रेती घेणे ही त्या गरीब त्याच्या परिवाराला परवडले नाही. म्हणून मित्राकडून ट्रॅक्टर ट्रॉली मागून स्वतः गरजेनुसार एक ट्रॅक्टर रेती आणणे आवश्यक वाटल्याने . त्या रात्री त्यांनी रेती आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळेस पोलिसांनी धडक कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त केला. आणि मात्र या घटनेने त्या परिवारावर आभाळच कोसळले . बांधकामाकरिता लागणारा खर्च त्यांना आता शासनाला दंड स्वरूपात भरून द्यावा लागला.
पोलिसांनी केलेली ही कार्यवाही कौतुकास्पदच आहे. मात्र संशयित ही आहे . रोज रात्री रात्रभर याच गावातून दहा- वीस ट्रॅक्टर रेती चोरी च्या ट्रिपा(फेर्या) मारल्या जातात . मात्र तेव्हा पोलिस का कारवाई करीत नाही ? आणि तेव्हा पोलिसांना कुणी अशी गुप्त माहिती पुरवत नाही का ? आणि शेतकरी किंवा गरजू व्यक्तीस जेव्हा आपल्या बांधकामाकरिता एखादी ट्राली रेती आणतो तेव्हाच यांना माहिती पुरविली जाते का ? कारण आमच्या शिवाय कोणीही नदीची रेती आणू नये आणि प्रत्येक जण आपापल्या सोयीने रेती आणू लागला तर आम्ही चोरून कुणाला विकायची अशीही भीती त्यांच्या रेती तस्करांच्या मनात असावीच. म्हनुनच कुणीतरी गावातील रेती माफियाच या कारवाई करीता माहिती पुरवीत असावा.असेही प्रश्न या कारवाईनंतर निर्माण झालेली आहे.
मात्र जर शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव केला तर लिलावाच्या पैशाने शासनाच्या तिजोरीत भर तर पडेलच पण गरजू व्यक्तींना ही बांधकामाकरिता रेतीची अवैध मार्गाने चोरी करावी लागणार नाही . तरी संबंधित विभागाने या रेतीची चोरीचा प्रकार आणि बांधकामातील करिता मोठ्या प्रमाणावर रेतीची आवश्यकता या बाबतीत गांभीर्याने विचार करावा.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!