तळोधी (बा.) पोलिसांची कारवाई ,रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त


भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम यांच्या मालकीचे ट्राक्टर असल्याची माहिती
   
                
तळोधी (बा) (यश कायरकर) 
काल रात्री १२:१५ वाजता पेट्रोलिंग वर असताना तळोधी पोलिसांना वलनी बस स्टॉप कडे  स्मशानखटी नाला,बोकोडोह नदी,च्या मार्गाने येताना रेती भरलेला ट्राक्टर आढळला तेव्हा थांबून चौकशी केली असता ट्रॅक्टर मध्ये अवैद्य पद्धतीने वाहतूक होत असलेली रेती भरलेले आढळून आली चालक अमीत अशोक नेवारे (२२)वलनी, याची चौकशी केल्या नंतर त्याच्याकडे  लायसन्सही नसल्याचे आढळून आले व सोबतच ट्रॅक्टर चे व ट्राली चे कोणतेही परवाना कागदपत्र उपलब्ध नव्हते व वाहतुकीचा परवानाही नसल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन तळोधी बाळापूर येथे जमा केला . व ट्राक्टर चालकाने दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर  वलनी येथील भारतीय जनता पार्टीचे माजी नागभीड तालुकाध्यक्ष होमदेव भाऊ मेश्राम यांचा असल्याचे लक्षात आले. ही जप्तीची कारवाई  तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री रविंद्र शंकर खैरकर एपीआय,  पुलीस हवालदार श्री एस.के. मांढरे, राहुल धुडसे यांनी केली, पुढील कार्यवाही करन्याकरीता नागभीड तहसील कार्यालय येथे पत्रव्यवहाराने माहिती पुरविली आहे. 
           विशेष म्हणजे श्री होमदेव मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वलनी ग्रामपंचायत सदस्यांनी काही दिवसांपूर्वी तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन येथे वलनी परिसरातील असलेली अवैध धंदे थांबवण्यात येऊन, अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी निवेदन  तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये काही दिवसापूर्वी दिलेला होता. मात्र रात्री च्या या कारवाईत नंतर स्वतः रेतीचोरी चे अवैध धंदे करीत असल्याचे उघडकीस आले . पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर रोजच रात्री परिसरातील अवैध रेती चोरणारे धास्तावलेले आहेत. 
आत्ता पर्यंत तळोधी पोलीसांनी केलेल्या कार्यवाही मध्ये तिन ट्राक्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करन्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!