कोविड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन संपन्न..



 शंकरपूर (जगदिश पेंदाम) 
 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे आज कोविड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विध्यमान गट नेता डॉ.सतीश वारजूकर यांचे हस्ते पार पडले असून कोरोना महामारी ला एक वर्ष पूर्ण झाले असल्याने कोरोणा लसीकरण मोहिमेस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू करण्यात आली आहे..
सोमवार बुधवार, गुरुवार व शनिवार आठवड्यातून चार वेळा लसीकरण देण्यात येईल अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजाता शंभरकर यांनी दिली असून 45 ते 60 वयातील नागरिकांना तसेच शुगर, बी पी हृदय रोग यांच्यासारख्या नागरिकांना सुद्धा न घाबरता कोरोना लस लावून शासनास सहकार्य करावे..
 पहिला स्टॉक 100  लस आली असल्यामुळे अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कोरोणा व्हायरल आजारापासून बचाव करण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे दिलेल्या आदेशानुसार आपण नियमांचे पालन करून नागरिकांनी सर्वांनी पुढाकार घेऊन कोरोणाला हद्दपार केले पाहिजे समाजामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत त्यांना न घाबरून आपण सर्व मिळून सहकार्याने कोविड 19 प्रतिबंधक लस घेऊन शासनाला मदत करून आणि स्वतःला कुटुंबाला व देशाला सुरक्षित ठेवण्याची विनंती यावेळी डॉ.सतीश वाजूरकर यांनी केले यावेळी उपस्थित चिमूर पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता शंभरकर, बोरकर सर, आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!