धर्माचरणाची आवश्यकता
धर्माचरण म्हणजे धर्मानुसार आचरण करणे.वागणे, बोलणे, खाणे, पिणे, सण- वार, वेशभूषा इत्यादि अनेक गोष्टींचे नियम धर्मामध्ये आहेत. धर्माचे क्षेत्र व्यापक आहे. आपण सध्या सणांचा विचार करूयात. आपण जे सण साजरे करतो, त्या सगळ्यांना काही शास्त्रीय कारणे आहेत. शास्त्र म्हणजे विज्ञान. विज्ञानात कोणतीही गोष्ट प्रायोगिक तत्वावरच असते. प्रयोग बरोबर झाला तर परिणाम योग्य येणार, तसेच धर्माचरणाचे आहे. योग्य कृती तर परिणाम योग्यच येईल.
कोणताही सण असो - दिवाळी, होळी किंवा गुढीपाडवा... शास्त्र समजून घेऊन साजरा केला तर जास्त लाभ होतो. देवाचं दर्शन कसं घ्यावं,... नमस्कार कश्या पद्धतीने करावा,... सौभाग्यवतीची ओटी कशी भरावी,... हळदीकुंकू कसे लावावे,... इत्यादि गोष्टी धर्माचरणातच येतात; कारण याही गोष्टींमागे शास्त्र आहे.
धर्मचरणात केवळ सणांचाच समावेश होतो असे नाही, तर निसर्गातील अनेक घटकांचा... उदा. वृक्ष, वेळी, नदी, पर्वत, समुद्र, पशू, पक्षी ह्यांच्याही बाबतीत आपण धर्म आचरणात आणायला हवा. धर्माचरणानुसार कृती केली नाही तर निसर्गाचा समतोल ढासळेल आणि पर्यायाने त्याचा अनिष्ट परिणाम आपल्यावर होईल.
धर्माचरण केल्याने मानवी मूल्यांची जपणूक होते, जोपासना होते. म्हणून आज धर्माचरणाची आवश्यकता आहे. मानवी मूल्यांची जोपासना करणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. रद्द
मानवी मूल्य संपली की मानव संपला. आपण धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे, अन्यथा नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!